मराठी साहित्याच्या या संमेलनात महाराष्ट्राची सांस्कृतिक विरासत आहे. ग्यानबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. ग्यानबा-तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करत आहे. पहिल्या आयोजनापासून आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा देश साक्षी राहिला आहे. महादेव गोविंद रानडे, हरिनारायण आपटे, माधव श्रीहरी अणे, वीर सावरकर, देशातील अनेक महान व्यक्तींनी या संमेलनाची अध्यक्षता स्वीकारली आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आमंत्रणावरून मला या गौरवपूर्ण परंपरेबरोबर जोडण्याचं भाग्य मिळाले, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काढले. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
(हेही वाचा – “मुंबईतील ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानांच्या भाडेपट्टा नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे” – DCM Ajit Pawar)
दिल्लीत २१ फेब्रुवारी या दिवशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी ते बोलत होते. आहे.
या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे. देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर आहेत. तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाषण करताना आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. “मराठी सारस्वतांना माझा नमस्कार”, असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी म्हणाले की, “आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्ष पूर्ण झाले आहेत”, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community