अवघ्या एक रुपयामध्ये मिळणार महापालिकेच्या रुग्णांना Dialysis सुविधा; कांदिवलीत सुरु होतेय हेमोडायलेसीस

141
अवघ्या एक रुपयामध्ये मिळणार महापालिकेच्या रुग्णांना Dialysis सुविधा; कांदिवलीत सुरु होतेय हेमोडायलेसीस
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

कांदिवली पश्चिम येथील डहाणूकर वाडी येथील एसआरए इमारत क्रमांक १ मधील दवाखान्यासाठी आरक्षित असलेली जागा आता खासगी सहभाग तत्वावर खासगी संस्थेला हेमोडायलेसीस करता भाडेकरारावर देण्यात येणार आहे. दहा वर्षांकरता ही जागा हेमोडायलेसीस करता दिली जाणार असून याठिकाणी अवघ्या एक रुपयामध्ये महापालिकेच्या डायलिसिसची (Dialysis) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

(हेही वाचा – Bangladeshi infiltrators: मेघालय सीमेवर 6 बांगलादेशी घुसखोरांना अटक; मदत करणाऱ्यांवरही होणार कारवाई)

कांदिवली पश्चिम येथील लिंक रोडवर असलेल्या आर्चिड सबर्बिया समोरील एसआरए इमारत क्रमांक १ मध्ये दवाखान्यासाठीची सुमारे ३२५ चौरस मीटरची जागा आरक्षण समायोजनाअंतर्गत बांधून मिळाली आहे. ही जागा सार्वजनिक खासगी सहभाग प्रोत्साहन धोरणानुसार अर्थात पीपीपी अंतर्गत देण्यासाठी महापालिकेच्यावतीने संस्थांकडून अर्ज मागवले होते. त्यात महापालिकेच्या वतीने मागवलेल्या या निविदेमध्ये रेनल प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या संस्थेने प्रती डायलिसिस (Dialysis) करता एक रुपयाकरता दर आकारण्याची संमती दर्शवली आहे. त्यानुसार या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या दवाखान्याच्या जागेवर एक रुपया दराने डायलिसिसची (Dialysis) सुविधा देण्यासाठी हेमोडायलेसीस केंद्र सुरु ठेवण्याकरता प्रथम ५ वर्षांसाठी आणि त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी अशाप्रकारे एकूण दहा वर्षांकरता करार करण्यात येणार आहे. प्रती वर्षी एक रुपया प्रती चौरस मीटर एवढ्या दराने भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य शासनाच्या मंजुरीसापेक्ष महापालिकेने ही मंजुरी दिली आहे.

(हेही वाचा – “मुंबईतील ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानांच्या भाडेपट्टा नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करावे” – DCM Ajit Pawar)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेनल प्रोजेक्ट ही संस्था या हेमोडायलेसीस केंद्रात रुग्णांना एक रुपयामध्ये प्रती डायलिसिस (Dialysis) एवढ्या दरात उपचार करेल. या केंद्रात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी कमीत कमी ४० टक्के रुग्ण हे महापालिकेने संदर्भित केलेले रुग्ण असतील आणि उर्वरीत ६० टक्के रुग्णांसाठी संस्था, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत तसेच राज्य, केंद्र तथा महापालिका यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकेल. या संस्थेला मान्यता दिल्यापासून तीन महिन्यांमध्ये या हेमोडायलेसीस केंद्र सुरु करणे बंधनकारक आहे. त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यासाठी या संस्थेला पाच हजार रुपये एवढा दंड असेल. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत हे केंद्र सुरु ठेवणे बंधनकारक राहणार आहे. ही संस्था हेमोडायलेसीस रुग्णांना महापालिकेच्या दरात उपचार देतील, त्यांना त्यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.