
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा (MPSC) परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या (MPSC Passed Candidates Appointed) देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या अशा एकूण 498 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी (21 फेब्रु.) जारी करण्यात आला आहे. (MPSC Passed Candidates Appointed)
हेही वाचा-स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – CM Devendra Fadnavis
यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी नियुक्त्या मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन देखील केले आहे. एमपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या उमेदवारांच्या नियुक्त्या प्रशासकीय कारणांमुळे अडकूण पडल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्व उमेदवार नियुक्त्यांच्या प्रतिक्षेत होते. अखेर शुक्रवारी या 498 उमेदवारांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आले आहेत. (MPSC Passed Candidates Appointed)
एपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेतून क्लास 2 च्या पोस्टसाठी उमेदवारांच्या निवडी झाल्या आहेत. यात उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सहाय्यक गट अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदींचा समावेश आहे. (MPSC Passed Candidates Appointed)
लवकरच पदभार स्वीकारणार
आता संबंधित पदांसाठी निवड झालेले उमेदवार लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे नियुक्त्या मिळेलल्या उमेदवारांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. नियुक्त्या मिळालेले 498 उमेदवार लवकरच पदभार स्वीकारुन शासनाच्या सेवेत कार्यरत होतील. (MPSC Passed Candidates Appointed)
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या आहेत. अशा एकूण 498 नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो !
यात उपजिल्हाधिकारी,… pic.twitter.com/fmdyMMhT0H— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 21, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलल्या पोस्टमध्ये म्हटले की, “महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षेतील गट-अ आणि गट-ब वर्गातील उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यात गट-अ च्या 229 तर गट-ब च्या 269 नियुक्त्या आहेत. अशा एकूण 498 नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो!” या पोस्टसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी शासन निर्णयाचे पत्रक देखील देखील जोडले आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. (MPSC Passed Candidates Appointed)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community