डॉक्टर असो वा वैद्यकीय शिक्षण (Government Medical College) घेणारे विद्यार्थी सर्वांना ॲप्रन (Apron) घालणे बंधनकारक आहे. मात्र, सार्वजनिक रुग्णालयांत या नियमाचे पालन होत नाही. यामुळे आता सरकारने (State Government) अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना ॲप्रन घालणे बंधनकारक केले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी तसे आदेशच काढले आहेत. (Government Medical College)
हा नवीन नियम नाही
मेडिकल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी अशी ४२ कॅालेजांमध्ये ७,७८७ विद्यार्थी आहेत. तर २,५६४ अध्यापक आहेत. बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांतील अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी ॲप्रन न घालताच रुग्णालयात वावरतात. आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही. वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन नियम नाही. मात्र, अनेकजण त्याचे पालन करत नाहीत. (Government Medical College)
ॲप्रन का घालावा?
ॲप्रनमुळे डॉक्टर, अन्य कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक यामधील फरक स्पष्ट होतो. ते रुग्णांच्या दृष्टीनेही सोयीस्कर ठरतो. ॲप्रन न घातल्याने जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार होऊ शकतो. मेडिकल कॉलेजेसशी संलग्न रुग्णालयांत ॲप्रन घालणे गरजेचे आहे. अधिष्ठाता, अध्यापक, निवासी डॉक्टर आणि एमबीबीएस अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी सगळ्यांनीचॲप्रन घालणे गरजेचे आहे. या संदर्भातील आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. असं हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. (Government Medical College)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community