तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा …

83
तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा ...
तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा ...

मध्य रेल्वे (Central Railway) , पश्चिम रेल्वे (Western Railway) मुंबई (Mumbai) विभाग रविवार दिनांक २३.०२.२०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (Megablock) परिचालीत करणार आहे. ट्रान्स हार्बर (Trans Harbor) मार्गावरील वाहतुकीलाही मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. या कालावधीमध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. (Megablock)

मध्य रेल्वे (Megablock)
कुठे : ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील.
कधी : सकाळी 10.40 वाजल्यापासून दुपारी 3.40 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल असणार आहे.
परिणाम : ब्लॅाक कालावधीत ठाणे – कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे (Megablock)
कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
कधी : सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.
परिणाम : ब्लॅाक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा, धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ट्रान्स हार्बर (Megablock)
कुठे : ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर धावतील
कधी : सकाळी 11.10 वाजल्यापासून दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक काळातील वेळापत्रकानुसार धावतील.
परिणाम : ब्लॅाक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.