एकेकाळी भारत तेरे तुकडे होंगेच्या देशविरोधी घोषणा दिले गेलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) मध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास शिकवला जाणार आहे. लवकरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एमएची पदवी संपादन करू शकतील. जेएनयूमध्ये एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व केंद्रित अध्ययनाला सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
(हेही वाचा – तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा …)
दोन वर्षांपूर्वी येथे अटलबिहारी वाजपेयी स्कूल आॅफ मॅनेजमेंट अँड आँत्रप्रेन्योरशिपची स्थापना झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील अध्यासनासाठी विद्यापिठात महाराष्ट्र सरकारच्या मदतीने २५ कोटी रुपयांतून भव्य भवन बांधण्यात आले आहे. २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या अध्ययन केंद्राचे काम सुरू होणार आहे.
कोणत्या विभागात होणार अभ्यास
स्पेशल सेंटर फॉर नॅशनल सेक्युरिटी स्टडीजच्या म्हणण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज गनिमी कावा ही युद्धकला, तसेच सागरी युद्धात निष्णात होते. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचा तर्क असा होता की, जगभरातील विद्यार्थ्यांना या अभ्यासाकडे आकर्षित केले पाहिजे. शेवटी स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे.
या संस्थेमध्ये (Jawaharlal Nehru University) यंदाचे संपूर्ण कॅलेंडर भारतीय अध्ययनावर आधारित असेल. त्यात श्रीमंत शंकरदेव यांच्याविषयी विशेष अध्ययन केंद्र सुरू केले जाणार आहे. ते आसामी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार, नर्तक, समाजसंघटक आणि हिंदू समाजसुधारक होते. सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज, हिंदू स्टडीज, जैन अध्ययन केंद्राशिवाय सेंटर फॉर आयुर्वेद अँड बायोलॉजीचा अभ्यासही यंदा सुरू होऊ शकतो. दक्षिणेतील आध्यात्मिक संत राजेंद्र चोला व आसामचे विद्वान लाचित बरफुकन यांच्यावर आधारित केंद्रही सुरू होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community