कर्नाटकमधील (Karnataka) चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या (Maharashtra ST driver) बसवर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत काळं फासल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर या बसच्या चालकाला मारहाण करून कन्नड (Kannada) येतं का विचारत काळं फासलं आहे.ही घटना शुक्रवार, २१ फेब्रुवारीच्या रात्री पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली असून, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
(हेही वाचा – JNU मध्ये सुरु होणार छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम)
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात जाणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसला कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी
रात्री साडेनऊच्या सुमारास अडवले. चालकास कन्नड येत का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे सांगितल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चालकास एसटीतून खाली उतरवून त्याच्यावर जोरदार हल्ला केला आणि तोंडाला काळ फासत कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करू लागले. शिवाय एसटीला देखील काळं फासलं. त्यानंतर एसटी चालकाला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, या घटनेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्रातून एसटी अधिकारी चित्रदुर्गच्या (Chitradurg) दिशेने रवाना झाले असून २२ फेब्रुवारी या दिवशी एसटी महाराष्ट्रात आणली जात आहे. मात्र, या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून आम्हाला सुरक्षा मिळाली नाही, तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शिवाय या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेचा निषेध केला असून, चालकाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, असं मत व्यक्त केलं आहे.
कर्नाटक सरकारने अशा गुंडांचा ताबडतोब बंदोबस्त करावा. कन्नड सक्ती करणे एसटीला काळा फासणे हे योग्य नाही. वातावरण चांगला असताना आम्हाला दिवसाच्या प्रयत्न करू नये. त्यांनी ट्रेलर दाखवला आहे आम्ही पिक्चर दाखवला तर त्यांना पळता भुई थोडी होईल. त्यांनी मारहाण केले त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी अन्यथा आम्ही ही रस्त्यावर उतरु. आम्हीही कर्नाटकच्या एसटी गाड्या अडवू. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर दोन्ही राज्यातील सरकार याला जबाबदार असेल, असं म्हणत शिवसेना उबाठाचे उपनेते संजय पवार यांनी इशाराच दिला आहे. (Karnataka)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community