- ऋजुता लुकतुके
व्हॅन हुसेन (Van Heusen) हा एरवी फॉर्मल म्हणजे कामाच्या ठिकाणी, बैठकांसाठी घालणाऱ्या कपड्यांचा ब्रँड आहे. १९२१ मध्ये अमेरिकेत हा ब्रँड पहिल्यांदा उदयाला आला. आणि अल्पावधीतच महिला व पुरुषांमध्ये तो लोकप्रियही झाला. भारतात मात्र हा ब्रँड आणण्याचं आणि तो यशस्वी करण्याचं श्रेय आदित्य बिर्ला फॅशन्सला जातं. १९९० मध्ये आदित्य बिर्लाने या ब्रँडच्या वितरणाची भारतातील जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून व्हॅन हुसेन (Van Heusen) भारतातही पसरला आहे. आदित्य बिर्ला फॅशन्सकडे लुई फिलीप, ॲलन सोली, पँटालून्स, अमेरिकन ईगल्स असे आणखी काही आंतरराष्ट्रीय ब्रँडही आहेत.
अमेरिकेत हा ब्रँड फिलीप्स – व्हॅन हुसेन (Van Heusen) कंपनीच्या मालकीचा आहे. त्यांच्याकडे टॉमी हिल्फिगर, ॲरो आणि केल्विन क्लाईन असे आणखी तीन ब्रँडही आहेत. तर भारतात हा ब्रँड आदित्य बिर्ला फॅशन्ससाठी विशक कुमार (Vishak Kumar) सांभाळतात. या ब्रँडचा इतिहास बघूया, (Van Heusen Owner)
(हेही वाचा – Kash Patel यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून अमेरिकेच्या एफबीआयच्या संचालकपदाची घेतली शपथ)
- १८८१ – मोझेस फिलीप्स आणि त्यांचा मुलगा आयझॅक खाणकामगारांसाठी लोकरी शर्ट विकत होते. आणि कामगारांमध्ये हे शर्ट लोकप्रिय होते.
- १९१० – फिलीप्स पिता-पुत्रांना आपल्या उत्पादनांचा विस्तार करायचा होता. आणि त्यासाठी ते न्यूयॉर्कमध्ये आले. तिथे त्यांची भेट व्हॅन हुसेन (Van Heusen) या डच निर्वासिताशी झाली. व्हॅन हुसेन यांच्याकडे विस्तारासाठी लागणारा पैसा होता.
- १९१९ – आणि यातून जन्म झाला फिलीप्स – व्हॅन हुसेन या कंपनीचा. त्याचवर्षी कॉलर असलेल्या शर्टवर या कंपनीने पेटंट मिळवलं.
- १९२१ – व्हॅन हुसेनचे (Van Heusen) कॉलर असलेले शर्ट पहिल्यांदा बाजारपेठेत आले. ‘स्माट कॉलर’ अशी त्यांची जाहिराती होती.
- १९५० – व्हॅन हुसेनचे (Van Heusen) कॉलर असलेले शर्ट लोकप्रिय झाले. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड़ रेगन व्हॅन हुसेनचे शर्ट घालत असत. आणि कामाच्या जागी घालायचे शर्ट अशी प्रसिद्धी त्यांना मिळाली.
- १९७४ – इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी व्हॅन हुसेनला (Van Heusen) आपली अधिकृत कपडे वितरक कंपनी म्हणून घोषित केलं.
- २००५ – व्हॅन हुसेन (Van Heusen) जगभरातील सगळ्यात मोठी शर्ट उत्पादक कंपनी बनली. या घडीला ७० देशांमध्ये कंपनीची ३०० रिटेल आऊटलेट्स आहेत, जिथे फक्त व्हॅन हुसेन शर्टचीच विक्री होते.
भारतात हा ब्रँड १९९० साली आला. सध्या भारतातही स्री, पुरुष व मुलांच्या कपड्यांसाठी हा सगळ्यात लोकप्रिय आणि सर्वाधिक खपाचा ब्रँड आहे. भारतात व्हॅन हुसेनची (Van Heusen) ९७ आऊटलेट्स आहेत. आणि यातील २७ एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. त्या खालोखाल दिल्ली व राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community