SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

112
SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या
SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या

राज्यात १० वी (SSC Exam) व १२ वीच्या परीक्षा होत आहेत. पहिल्याच दिवशी दहावीचा मराठीचा पेपर फुटला होता. दरम्यान आता दहावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून एकाने वर्गातील मित्रांवर गोळीबार (firing) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. (SSC Exam)

नेमकं काय घडलं?
बिहारमधील (Bihar) रोहतक जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. दहावीचा सामाजिक शास्त्राचा पेपर देऊन विद्यार्थी घरी परतत असताना गुरूवारी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दिवस आधी संस्कृत भाषेच्या परीक्षेवेळी आरोपीने त्याच्या दोन वर्गमित्रांना त्यांच्या उत्तरपत्रिका दाखवण्यास सांगितले होते, पण त्या दोघांनी त्याला नकार दिला. त्यानंतर त्याने दोघांना परीक्षा केंद्राच्या बाहेर धमकी दिली आणि त्यानंतर त्यांच्यात हाणमारी देखील झाली. यावेळी इतर विद्यार्थ्यांनी मध्ये पडत त्यांना शांत केले. (SSC Exam)

हेही वाचा-Tiger Poaching : धक्कादायक ! गेल्या 4 महिन्यात म्यानमारमार्गे भारतातून किमान 15 वाघांची चीनमध्ये तस्करी

दुसऱ्या दिवशी हे दोन विद्यार्थी जेव्हा इतराबरोबर ऑटोमधून घरी जात होते, तर दुसरा मुलगा त्याच्या मित्रांबरोबर त्यांचा पाठलाग करत होता. त्याने ऑटो थांबवण्यास भाग पाडले आणि मृत विद्यार्थ्याबरोबर वाद घालू लागला असे पोलिसांनी सांगितले. वाद सुरू असताना त्याने देशी बनावटीच्या बंदुकीतून गोळीबार केल्याचा आरोप आहे. गोळीबारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोघांपैकी एक विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दुसरा विद्यार्थी बचावला. (SSC Exam)

हेही वाचा-आता Government Medical College मध्ये ॲप्रनसक्ती लागू; राज्य सरकारचा आदेश

रोहतासचे एसपी रौशन कुमार यांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कव नदीवरील पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग २ येथे घडली. सासाराम उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने संशयिताला त्याच्या मामाच्या घरातून ताब्यात घेतले. पथकाने गोळीबारात वापरलेले पिस्तूल आणि त्याच्या मामाच्या घरामागे लपवलेले मोबाईल फोन देखील जप्त केले, असेही पोलिसांनी सांगितले. (SSC Exam)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.