Safari Bags : आणि सफारी बॅग्जनी व्हीआयपीला ३ वर्षांत मागे टाकलं…

Safari Bags : सफारी बॅग्ज सुधीर जाटिया यांच्या ताब्यात गेल्यावर कंपनीचा कायापालट झाला आहे.

45
Safari Bags : आणि सफारी बॅग्जनी व्हीआयपीला ३ वर्षांत मागे टाकलं…
  • ऋजुता लुकतुके

एरवी व्हीआयपी हा देशातील जुना आणि लोकप्रिय प्रवासी सामानाचा ब्रँड. नावाप्रमाणे दिमाखदार लगेज बॅग बनवणारी कंपनी अशी त्यांची ओळख होती. पण, मागच्या फक्त ३ वर्षांत सफारी बॅग्ज या आणखी एका भारतीय कंपनीनेच व्हीआयपीला मागे टाकत देशातील नंबर वन लगेच कंपनी होण्याचा मान मिळवला आहे आणि सफारी बॅग्जचा हा प्रवास व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीही एक उदाहरण मानलं जात आहे. (Safari Bags)

सफारी बॅग्जचा हा कायापालट झाला तो सुधीर जाटिया यांनी कंपनीची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर मुंबईत वाणिज्य विषयात स्नातक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सुधीर जाटिया आधी व्हीआयपी इंडस्ट्रीतच काम करत होते आणि तिथूनच त्यांनी या उद्योगाचे प्राथमिक धडे गिरवले आणि त्यांना कल्पना सुचली लगेज उद्योग वाढवण्याची. बी कॉम केल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी प्रेसिडंट मॅनेजमेंट अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि त्याच्या जोरावरच ते व्हीआयपी इंडस्ट्रीत व्यवस्थापकीय संचालक पदावर रुजू झाले. (Safari Bags)

व्हीआयपी कंपनी तेव्हा खरंतर या उद्योगात अडखळत होती आणि कंपनीचा विस्तार होत नव्हता. पण, तरीही जाटिया यांनी याच उद्योगात नशीब आजमावायचं ठरवलं. आणि २०११ मध्ये सफारी इंडस्ट्रीज ही दुसरी भारतीय लगेज कंपनी विकत घेतली. हा त्यांनी खेळलेला एक मोठा जुगार होता. कारण, त्यांनी त्यांनी स्वत:च्या खिशातून २९ कोटी रुपये त्यासाठी घातले होते. १९७४ साली सफारी इंडस्ट्रीज ही कंपनी भारतात उदयाला आली होती. पण, तिचा खरा विकास झाला तो जाटिया यांच्या कार्यकाळातच. (Safari Bags)

(हेही वाचा – Kash Patel यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून अमेरिकेच्या एफबीआयच्या संचालकपदाची घेतली शपथ)

कारण, जाटियांनी पाच महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं.

बाजारपेठेचा विस्तार – भारतातील नवतरुण आणि मध्यमवर्गीयांमध्ये असलेली पर्यटन आणि प्रवासाची हौस यामुळे बाजारपेठ वाढत होती आणि अशा नवीन ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यासाठी सफारीने कंबर कसली. वितरण व्यवस्था सक्षम केली.

उत्पादनांमधील विविधता – प्रत्येक ग्राहक वेगळा असतो असं मानून, बॅगा, पर्स, सॅक लॅपटॉप बॅग्स अशा विविध उत्पादनांची त्यांनी भारतात सुरुवात केली

भक्कम वितरण यंत्रणा – मालाचा दर्जा चांगला असेल तरी ती तुमच्यापर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं. ते लक्षात घेऊन जाटिया यांनी सगळ्यात जास्त भर दिला तो वितरण व्यवस्था वाढवण्यावर. देशभरात सफारी बॅग्ज उपलब्ध होतील असं त्यांनी पाहिलं.

उत्पादनांमध्ये नाविन्य – अमेरिकेत राहून आलेले जाटिया तिथे होणारे बदल पाहत होते. त्यामुळे वजनाला हलक्या आधुनिक बॅगा भारतात कशा तयार होतील हे त्यांना पाहिलं आणि त्यासाठी कच्चा माल कायम बाहेरून आयात केला. बॅगांचं डिझाईनही आधुनिक असेल असं पाहिलं. त्यासाठी मेहनत घेतली.

ब्रँड बांधणी – सफारी हा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचावा तो आपला वाटावा आणि त्याची विश्वासार्हता वाढावी यासाठीही जाटिया यांनी विशेष प्रयत्न केले.

यामुळे सध्या सफारी हा देशातील सर्वोत्तम लगेच ब्रँड बनला आहे. (Safari Bags)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.