-
ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध पाकिस्तान हा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यानचा सामना रंगतदार होण्यासाठी मैदानाबाहेरील काही कारणंही आहेत. कारण, मैदानात जशी सर्वोत्तम कामगिरी होते तशीच खेळाबाहेरचे प्रसंगही घडतात. ते वादग्रस्त ठरतात. पण, त्यातून दोन संघांमधील स्पर्धाच अधोरेखित होते. असेच वादाचे ५ गाजलेले प्रसंग पाहूया, (Champions Trophy, Ind vs Pak)
जावेद मियांदादच्या कांगारू उड्या
जावेद मियांदाद आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना अस्वस्थ करायचा तसंच तो फलंदाजीच्यावेळी करत असलेल्या हरकतींनीही. १९९२ सालच्या विश्वचषकात जेव्हा दोन संघ आमने सामने आले. भारतीय संघ तेव्हा धावांच्या बाबतीत पुढे होता. आणि मियांदाद पाकिस्तानचा डाव सावरण्याच्या प्रयत्नांत होता. यष्टीरक्षक किरण मोरेच्या वारंवार अपील करण्यावर तो वैतागला. आणि एका क्षणी एक धाव पूर्ण केल्यावर मियांदादने चक्क मैदानावर कांगारू सारख्या उड्या मारायला सुरुवात केली. मोरेच्या अपील करण्याची तो नक्कल करत होता. अखेर मियांदाद १८ धावांवर बाद झाला. आणि भारताने सामना जिंकला. (Champions Trophy, Ind vs Pak)
(हेही वाचा – Marine Lines परिसरातील ६ मजली इमारतीला भीषण आग)
प्रसाद आणि आमीर सोहेल यांच्यातील वाद
पुन्हा एकदा १९९६ च्या विश्वचषकात दोन्ही संघ आमने सामने आले. बंगळुरुमध्ये आधीच अजय जाडेजाच्या २२ चेंडूंत ४५ धावांच्या खेळीने पाकिस्तानचा जीव घेतला होता. त्यांना २८९ धावांचा पाठलाग करायचा होता. त्यातच आमीर सोहेलने वेंकटेश प्रसादला लागोपाठ दोन चौकार मारल्यावर त्याला काय झालं कुणास ठाऊक? त्याने प्रसादकडे पाहून हातवारे केले. आणि असाच एक चौकार तुला पुढच्या चेंडूवर ठोकून दाखवतो असं बोलून दाखवलं. पुढच्याच चेंडूवर प्रसादने सोहेलचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पाक डावाची घसऱण सुरू झाली. बिनबाद ८७ वरून पाकिस्तानचा संघ २४८ धावांत गुंडाळला गेला. (Champions Trophy, Ind vs Pak)
इंझमामचा भारतीय चाहत्यांवर हल्ला
१९९७ मध्ये टोरंटोत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भरवण्यात आली होती. इंझमाम उल हकचं वजन तेव्हा वाढलं होतं. काही भारतीय चाहत्यांनी त्याला आलू, आलू असं चिडवलं. इंझमाम इतका चिडला की, त्यांच्यावर बॅट उगारत धावून गेला. तेव्हा इंझमाम क्षेत्ररक्षण करत होता. पण, चाहत्यांचा आवाज वाढल्यावर त्याने एका सहकाऱ्याला बॅट आणायला सांगितली. आणि तो प्रेक्षकांमध्ये घुसला. इंझमामवर कारवाई झाली होती. (Champions Trophy, Ind vs Pak)
(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Pak : भारत-पाकचा सार्वकालीन सर्वोत्तम ११ जणांचा संघ)
आफ्रिदी वि गंभीर
२००७ मध्ये अशाच एका सामन्यात गौतम गंभीरने शाहीद आफ्रिदीला चौकार लगावला. ही गोष्ट आफ्रिदीच्या जिव्हारी लागली. आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघंही ऐकायला तयार नव्हते. पुढच्याच षटकात एकेरी धाव घेताना दोघांनी एकमेकांना पुन्हा एकदा धक्का दिला. शाब्दिक चकमक पुन्हा सुरू झाली. शेवटी पंचांना मध्ये पडायला लागलं. दोघांमधलं भांडण तिथेच संपलं नाही तर आताही दोघं सोशल मीडियावर एकमेकांविरुद्धचा राग मोकळा करताना दिसतात. (Champions Trophy, Ind vs Pak)
शोएब अख्तर वि हरभजन
२०१० च्या आशिया चषकात शोएब अख्तरच्या चेंडूवर हरभजनला धाव घेता आली नाही. त्यावरून अख्तरने त्याला चिडवलं. हरभजनही ऐकणार नव्हताच. दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि पुढे हरभजनने षटकार मारून भारतीय संघाला जिंकून दिल्यावर शोएब अख्तरसमोर जोरदार आनंद साजरा केला. तर अख्तरने खुणेनंच त्याला तंबूत परत जा असं सुनावलं. (Champions Trophy, Ind vs Pak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community