महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेला परवानगी दिली. त्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ सप्टेंबर रोजी संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून देखील सातत्याने परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती.
#mpsc
धन्यवाद @CMOMaharashtra pic.twitter.com/qWItPpduIc— स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@Mpsc_Andolan) August 4, 2021
(हेही वाचा : दिल्लीत चहापान, राज्यात मात्र फोडाफोडीचे काम!)
कोरोनामुळे परीक्षा होती स्थगित
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी समाजातून होत होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षेच्या आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये राज्यशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगाने ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community