मुंबई-नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट (Kasara Ghat) पुढील 6 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 2 टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वा या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
(हेही वाचा – Telangana मध्ये बोगद्याचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना; ६ कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु)
सोमवारपासून म्हणजेचं 24 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात (Kasara Ghat) रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतय्यारी साठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून (Kasara Ghat) वळविण्यात येणार आहे. तर जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहणाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे परंतु या दरम्यान या मार्गांवरून अवजड वाहनांना पूर्ण पणे बंदी घालण्यात आली असून ओडिसीसारखी अवजड वाहने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या मार्गे वळविण्यात येणार आहेत.
(हेही वाचा – कोस्टल रोड प्रकल्पात कच्चा माल पुरवणारे ठेकेदार कोण?; अमेय घोले यांनी Shiv Sena UBT ला केला सवाल)
दरम्यान कसारा घाटातील (Kasara Ghat) रस्ते दुरुस्ती व त्यामुळे वळविण्यात येणारी मार्गिका लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, महामार्ग पोलीस शहापूर केंद्र, आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारली जाणार आहेत. जुन्या कसारा घाटातील (Kasara Ghat) डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढावीत त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात त्रास होणार नाही अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन सदस्याकडून करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community