‘महाकुंभ’ साठी Central Railway ने मुंबईतून दिल्या ८२३ ट्रेन सेवा

48
'महाकुंभ' साठी Central Railway ने मुंबईतून दिल्या ८२३ ट्रेन सेवा

महाकुंभ-२०२५ मध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी सुरळीत आणि त्रासमुक्त प्रवास सुनिश्चित करण्यात मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सुनियोजित आणि विस्तृत रेल्वे सेवा नेटवर्कमुळे लाखो भाविक जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यात आरामात प्रवास करू शकले आहेत. (Central Railway)

(हेही वाचा – कोस्टल रोड प्रकल्पात कच्चा माल पुरवणारे ठेकेदार कोण?; अमेय घोले यांनी Shiv Sena UBT ला केला सवाल)

दि. ८ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत, एकट्या मुंबईतून एकूण ८२३ रेल्वे सेवा चालवण्यात आल्या आहेत, ज्यात कुंभमेळ्यातील यात्रेकरूंच्या प्रवासासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७०८ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ११५ रेल्वे सेवांचा समावेश आहे.

मुंबई व्यतिरिक्त, पुणे विभागातून ६ विशेष गाड्यांसह १०२ ट्रेन सेवा चालवून तर नागपूर स्थानकावर ६ विशेष गाड्यांसह २२५ ट्रेन सेवा चालवून हजारो भाविकांची सोय करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. (Central Railway)

(हेही वाचा – Telangana मध्ये बोगद्याचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना; ६ कामगार अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु)

याव्यतिरिक्त, मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरून जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून आली आहे :

  • ठाणे येथे ३८३ गाड्यांना थांबे आहेत.
  • कल्याण येथे ६८७ गाड्यांना थांबे आहेत.
  • भुसावळ येथे ७२३ गाड्यांना थांबे आहेत.
  • नाशिक येथे ६०१ गाड्यांचे थांबे आहेत.
  • ५३७ गाड्यांना मनमाड येथे थांबे आहेत.
  • बैतूल येथे १३८ गाड्यांना थांबे आहेत.

(हेही वाचा – प्रेम, संवाद, सहवास, सहनशीलतेमुळे Marathi चा अमराठीशी सुखाने संसार !)

या व्यापक व्यवस्थेसह, मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अखंड आणि कार्यक्षम वाहतूक उपलब्ध करून देण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, जेणेकरून भाविक महाकुंभ-२०२५ मध्ये आरामात सहभागी होऊ शकतील. (Central Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.