-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अर्थात कोस्टल रोड अंतर्गत हाजी अली येथील पुलावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेले मास्टिक आवरण काढण्याची कार्यवाही सुरू झाली असून येत्या एक ते दोन दिवसांत नव्याने डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. (Coastal Road)
(हेही वाचा – Budget Session : अधिवेशनाच्या तोंडावर राजकीय रणसंग्राम)
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील आंतरमार्गिका व मुख्य पुलावर महापालिकेने सांध्यामध्ये मास्टिक डांबराचे आवरण टाकल्याने खड्डे सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाहीत. किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिक आवरणाचे होते. सोशल मिडियावर याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने याबाबत महापालिकेवर टिकेची झोड उडवली जात आहे. (Coastal Road)
(हेही वाचा – NCP च्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिल पाटील आणि लहू कानडे यांची नियुक्ती)
त्यातच पंतप्रधान कार्यालयानेही याची दखल घेतल्याने महापालिका प्रशासनाने अधिक दखल घेत या रस्त्यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकण्यात आलेले मास्टिक आवरण काढण्याची कार्यवाही महानगरपालिकेकडून तातडीने सुरू करण्यात आली आहे. हे आवरण उकरून काढून झाल्यानंतर येत्या एक ते दोन दिवसांत नव्याने डांबरीकरण करण्यात येणार आहे. (Coastal Road)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community