पी. एम. किसान योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी दु. 2.00 ते 3.00 या वेळेत 19 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana)
बिहार राज्यातील भागलपूर येथे किसान सन्मान समारोह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana)
(हेही वाचा – Buldhana Crime : बुलढाण्यात अफूची शेती ; 12 कोटींचा अफू जप्त, मक्याच्या पिकात केली मधोमध लागवड)
या ऑनलाईन समारंभामध्ये सर्व खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. प्रगतीशील शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. मंत्री (कृषी), महाराष्ट्र राज्य यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनीही या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana)
तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभाग, ठाणे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे. (PM Kisan Samman Nidhi Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community