हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) मंडी येथे रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 इतकी मोजण्यात आली. जमिनीच्या आत त्याची खोली 5 किलोमीटर होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार (एनसीएस) सकाळी 8 वाजून 42 मिनीटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र सुंदरनगर येथील किआर्गी होते.
(हेही वाचा – Ashish Shelar : छत्रपती शिवरायांच्या ‘या’ 12 किल्ल्यांना जागतिक वारसास्थळे बनवणार; महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिससाठी रवाना)
यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाचे केंद्र ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाजवळ एक तलाव आहे. या प्रदेशात दर 2 ते 3 वर्षांनी एकदा लहान आणि कमी तीव्रतेचे भूकंप होतात. यापूर्वी 2015 मध्ये येथे 3.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता. हिमाचल प्रदेशसोबतच (Himachal Pradesh) दिल्ली-एनसीआर तसेच शेजारील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की इमारतींच्या आत तीव्र कंपने जाणवली. पहाटे 5 वाजून 36 मिनीटांनी हा भूकंप जाणवला.
(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी ‘मन की बात’मध्ये दिला आरोग्याचा मंत्र; देशातील प्रत्येक ८ पैकी एक व्यक्ती लठ्ठपणाचा बळी)
दिल्लीच्या धौला कुआं येथील दुर्गाबाई देशमुख विशेष शिक्षण महाविद्यालयाजवळ भूकंपाचे केंद्र असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घराबाहेर पडले. अनेक ठिकाणी भूकंपाच्या कमी तीव्रतेमुळे, बहुतेक लोकांना धक्के जाणवू शकले नाहीत. राज्यातील चंबा, शिमला, कुल्लू, लाहौल स्पीती, कांगडा, किन्नौर आणि मंडी येथील अनेक भाग भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या झोन-5 मध्ये येतात. म्हणूनच येथे वारंवार भूकंप होत राहतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community