देवगड (Devgad) येथे मत्स्यव्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी येणार असून, जूनपासून अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे.
(हेही वाचा – Mumbai Metro-3 : मुंबईकरांना भूमिगत मेट्रो नको ; काय आहे कारण ?)
कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० किमी लांबीपैकी सुमारे १२१ किमी लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी लगतच्या ८७ गावांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. सिंधुदुर्गमध्ये एकूण मच्छीमारांची लोकसंख्या ३२ हजार, १७ इतकी आहे. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले याठिकाणी बंदरे आणि मच्छींची उतरणावळ करणारे ३४ धक्के आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक कोल्ड स्टोरेजेस असून, त्याद्वारे मच्छीवर प्रक्रिया केली जाते. असे असूनही जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्यव्यवसाय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. (Devgad)
(हेही वाचा – Mhada Lottery: सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाकडून २ हजार घरांसाठी लॉटरी निघणार)
मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांची ही संकल्पना आहे. त्यासाठी जागेचा शोध पूर्ण झाला आहे. या महाविद्यालयासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. हे मत्स्यव्यवसाय महाविद्यालय दापोली कृषी महाविद्यालयाशी संलग्न असेल. त्यासंदर्भातील बैठक कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमवेत पार पडली आहे. त्यास मंत्री नितेश राणेही हजर होते. (Devgad)
(हेही वाचा – Himachal Pradesh : मंडी येथे 3.7 तीव्रतेचा भूकंप)
काय होणार फायदा ?
देवगडमध्ये (Devgad) मत्स्यव्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. मत्स्यव्यवसाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक खारे, निमखारे आणि गोड्या पाण्याचे स्रोत तेथे उपलब्ध आहेत. पुरेशी जागा, दळणवळणाच्या सोई, तसेच, आनंदवाडीसारखा मोठा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. याठिकाणी महाविद्यालय सुरू झाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना नोकरी आणि व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट यांसारख्या पदव्या प्राप्त करणे सोयीचे होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community