९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राजधानी दिल्लीत सुरु आहे. यावेळी मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मोठा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. गोऱ्हे यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे.
( हेही वाचा : Budget Session : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ मार्चपासून मुंबईत सुरु होणार)
नीलम गोऱ्हे नेमंक काय म्हणाल्या?
कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काहीही कारण नाही. २०१२ पर्यंत होणाऱ्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park)
सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेच कार्यकर्ते गर्दी करत होते. दुसरा मुद्दा असा की, नेत्यांना संपर्क नको असेल तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या दिल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंतल हयात होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर पक्षप्रमुखांची आम्हाला भेटच मिळणार नाही, हे माहिती नव्हतं, असे ही गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा धन्यता वाटली होती पण…
२०१९ ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटणार नाही,. मग ती भेट कुठल्याही विषयासाठी असो. दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाही. यानंतर प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतरं होतात ती काही मुदपाक खान्याच्या विश्लेषणातून होत नाहीत. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नुकताच महादजी शिंदे पुरस्कार मिळाला आहे. ते या सगळ्यावर बोलतील. असंही नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या. साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community