होळी खेळण्यास Pakistan मधील विद्यापीठात बंदी; नियमभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल

37
होळी खेळण्यास Pakistan मधील विद्यापीठात बंदी; नियमभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल
होळी खेळण्यास Pakistan मधील विद्यापीठात बंदी; नियमभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल

पाकिस्तानमध्ये (Pakistan) हिंदू (Hindu) अल्पसंख्याकांवरील धार्मिक भेदभाव आणि अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कराची येथील दाऊद अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने हिंदू (Hindu) विद्यार्थ्यांना होळी साजरी करण्याबाबत नोटीस बजावली आहे. एवढेच नाही तर ‘देशविरोधी घोषणा’ दिल्याच्या आरोपाखाली काही विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे.

( हेही वाचा : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं; Neelam Gorhe यांचा आरोप

ओम प्रकाश (Om Prakash) नावाच्या हिंदू (Hindu) विद्यार्थ्याला पाठवलेल्या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, “ दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तुम्ही विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ‘तुहुंजो देश मुहुंजो देश सिंधू देश’ अशा देशविरोधी घोषणा दिल्या आणि शैक्षणिक क्रियाकलापांमध्ये व्यत्यय आणला. हे नियमांचे उल्लंघन आहे. यानंतर, विद्यार्थ्याच्या विद्यापीठात प्रवेशावर बंदी घालण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. (Pakistan)

पाकिस्तानच्या (Pakistan) राष्ट्रीय सभेचे माजी सदस्य लाल चंद मल्ही (Lal Chand Malhi) यांनी समाजमाध्यमांवर प्रश्न उपस्थित केला तेव्हा हे प्रकरण चर्चेत आले. त्यांनी विचारले, “पाकिस्तानात होळी साजरी करणे आता गुन्हा झाला आहे का?” मल्ही यांचे हे विधान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आणि पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांप्रती वाढत्या असहिष्णुतेवर वादविवाद सुरू झाला.

विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये होळी साजरी केल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी रंगांसोबत होळी खेळताना उत्सवाचा आनंद घेताना दिसत आहेत. पण यानंतर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आणि एक नोटीस जारी केली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी असे काही केले जे ‘देशविरोधी’ असू शकते असा आरोप करण्यात आला. पाकिस्तानमधील (Pakistan) हिंदू (Hindu) समुदायाला आधीच मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागात हिंदूंना (Hindu) जबरदस्तीने धर्मांतर, अपहरण आणि अत्याचारांना सामोरे जावे लागते. कायद्याचा गैरवापर करून अनेक वेळा त्यांच्यावर खोटे खटले दाखल केले जातात, त्यामुळे त्यांना कायदेशीररित्याही न्याय मिळणे कठीण आहे. (Pakistan)

दरम्यान भारतीय पत्रकार आदित्य राज कौल (Aditya Raj Kaul) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “पाकिस्तानात हिंदू (Hindu) अल्पसंख्याकांना सतत लक्ष्य केले जात आहे. कराचीच्या या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना फक्त होळी खेळल्याबद्दल नोटीस बजावली आणि एफआयआर देखील नोंदवण्यात आला. कट्टरपंथी इस्लामी घटक विद्यार्थ्यांना धमकावण्यात गुंतले आहेत. पाकिस्तानमध्ये हे काही नवीन प्रकरण नाही. यापूर्वी अनेक वेळा हिंदू सण थांबवणे, मंदिरांवर हल्ला करणे आणि अल्पसंख्याकांवर खोटे आरोप करणे अशा घटना समोर आल्या आहेत. २०२३ मध्ये, लाहोरमधील पंजाब विद्यापीठात होळी खेळल्याबद्दल हिंदू विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आणि होळी खेळण्यावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली. एवढेच नाही तर एका मौलानांनी होळीला विरोध केला होता. (Pakistan)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.