साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे विधान

46
साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे विधान
साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचे विधान

९८ व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) अध्यक्षा तारा भवाळकर (Tara Bhavalkar) यांचा सत्कार करून संमेलनाचा समारोप झाला. यावेळी दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषेचा महाकुंभ आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काढले. तसेच दिल्लीत (Delhi) मराठी लोकांसाठी एक भवन उभारले जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात हवी ती तरतूद केली जाईल, असे आश्वासन अजित पवारांनी साहित्य संमेलनाच्या मंचावरून साहित्यिकांना दिले.

( हेही वाचा : लष्करप्रमुख जनरल Upendra Dwivedi फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना

दरम्यान साहित्य संमेलन आयोजन करण्यात सहभागी असलेल्या सर्वांचा सत्कार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. एकूण १२ ठराव यावेळी साहित्य महामंडळाच्या वतीने मांडण्यात आले त्याला उपस्थित त्यांनी हात उंचावून अनुमोदन दिले. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडले. सरहद, पुणे या संस्थेने संमेलनाचे आयोजन केले होते. समारोपीय कार्यक्रमाला संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर (Tara Bhavalkar) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , मंत्री उदय सामंत, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, निमंत्रक संजय नहार, उज्वला मेहेंदळे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, इतिहासात तलवारीने दिल्ली जिंकली, आता सारस्वतांच्या विचारांनी दिल्ली जिंकली आहे. मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा हा संगम आहे आणि मराठी भाषेचा महाकुंभ आहे. अभिजात मराठीचे हे पहिले संमेलन आहे, जे राजधानी दिल्लीत होत आहे. मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे आभार. मी मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याची दखल संयोजक संजय नहार यांनी घेतली. तसेच संमेलनाचे निमंत्रक संजय नहार यांचे काम हिमालयाएवढे उंच आहे, असेही ते म्हणाले. तसेच छावा चित्रपटाचा उल्लेख करत मराठीत चित्रपटाचे डबिंग करण्याची विनंती दिग्दर्शकांना करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. (Eknath Shinde)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.