Mahakumbh 2025 : महाकुंभमधील हायटेक खोया-पाया केंद्राने केली उल्लेखनीय कामगिरी; ‘असे’ चालते काम

52

प्रयागराज (Prayagraj) येथे १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभपर्वाला ६० कोटीहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. मोठ्या यात्रांमधील गर्दीमुळे बऱ्याचदा कुटुंबियांपासून दुरावण्याचे प्रसंग येतात. बेपत्ता वस्तू आणि व्यक्तींचा शोध लागण्यासाठी यंदा एआयच्या साहाय्याने यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे यंदा अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. (Mahakumbh 2025)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती ही सावरकर निष्ठांची मांदियाळी)

कुंभपर्वाचे शेवटचे ३ दिवस उरले आहे. कुंभ सुरु झाल्यापासून आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या. त्यातील बहुतांश जणांचा २४ तासांच्या आत शोध घेण्यात प्रशासनाला यश आले. दरवेळेप्रमाणे यंदादेखील प्रयागराजमध्ये (Prayagraj Kumbh mela 2025) ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदा यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीदेखील मदत घेण्यात येत आहे.

महाकुंभ क्षेत्रात दहाहून अधिक ‘खोया-पाया’ केंद्र (Khoya-Paya Center) स्थापन करण्यात आले आहेत. ही प्रामुख्याने महाकुंभातील विविध सेक्टर, तसेच संगम, झुंसी, अरैल घाट, फाफामऊ, प्रयागराज रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात आहेत. ही केंद्र संगणकीकृत आहेत. तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फेस रेकग्निशन सिस्टम (Face recognition system), मशीन लर्निंगचादेखील वापर करण्यात येत आहे. सर्व केंद्र एकमेकांशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तीला शोधणे सोपे होत आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

कसे चालते खोया-पाया केंद्राचे काम

देशाच्या विविध भागांतून भाविक आल्यामुळे सर्वांनाच हिंदी नीट समजत नाही. काहींना हिंदी नीट पद्धतीने समजत नाही. अशा लोकांसाठी मराठी, तेलुगू, गुजराती अशा विविध भाषांमध्येदेखील उद्घोषणा करण्यात येत आहे. हरविलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या कुटुंबियांनी कुठल्या जागेवर यावे याची माहितीदेखील देण्यात येते. तसेच जागोजागी लागलेल्या एलईडी स्क्रीन्सवर फोटो दाखवण्यात येतात. सोशल माध्यमांचादेखील उपयोग करण्यात येत आहे. हरवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना या केंद्रावर आधार दिला जातो. त्यांच्या तात्पुरत्या निवासाचीदेखील सोय करण्यात आली आहे. महिलांसाठीदेखील वेगळी सोय करण्यात आली आहे. (Mahakumbh 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.