अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आणखी काही सरकारी कर्मचाऱ्यांना (USAID) कामावरून काढून टाकले आहे, तसेच हजारो कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठविण्याचे आदेश जारी केले आहेत. आताचे हे कर्मचारी युएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचे (US Agency for International Development) आहेत. २००० कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ देण्यात आला आहे. (Donald Trump)
हेही वाचा-Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती ही सावरकर निष्ठांची मांदियाळी
शुक्रवारी एका संघीय न्यायाधीशाने प्रशासनाला USAID कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची परवानगी दिली होती. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्याची कर्मचाऱ्यांची विनंती न्यायाधीश कार्ल निकोल्स यांनी फेटाळून लावली. (Donald Trump)
हेही वाचा-Bhiwandi मध्ये वासनांध मुसलमान मोहम्मद सैदने साथीदारांसह मुलीवर केला सामूहिक बलात्कार
यानंतर लगेचच वेळ न दवडता ट्रम्प यांनी अधिसूचना जारी केली आहे. मिशन-आधारित आवश्यक कार्ये, प्रमुख नेतृत्व आणि विशेषतः नियुक्त केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेले कर्मचारी यातून वगळण्यात आले आहेत. यूएसएआयडीचे वॉशिंग्टन मुख्यालय बंद करण्यात आले होते. जागतिक स्तरावर हजारो मदत आणि विकास कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. (Donald Trump)
या मोहिमेद्वारे परदेशात असलेल्या लोकांना आता धक्का बसला आहे. परदेशात तैनात कर्मचाऱ्यांना आपत्कालीन संपर्क सुविधा पुरवल्या जाणार आहेत. टू-वे रेडिओ आणि पॅनिक बटण सुविधा असलेले मोबाइल अॅप उपलब्ध असणार असल्याचे सरकारने कोर्टात सांगितले आहे. (Donald Trump)
हेही वाचा-Love Jihad : लव्ह जिहादविरोधी कायद्याला घाबरता का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच लाखभर कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांची उपयुक्तता तपासण्यात येणार आहे. यासाठी त्यांची लाय डिटेक्टर चाचणी घेतली जाणार आहे. सरकारच्या गोपनिय फाईल्स लीक होऊ नयेत किंवा केल्या असतील या संशयातून ट्रम्प सरकार या लाखो कर्मचाऱ्यांची लाय डिटेक्टर टेस्ट करणार आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सरकारी गोपनिय कागदपत्रे लीक होण्यापासून वाचविण्यासाठी कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community