अजमेर दर्गा हे शिवमंदिर, Mahashivratri 2025 ला पूजा करण्याची परवानगी द्या; हिंदु सेनेची मागणी

69

हिंदु सेनेचे (Hindu Sena) राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे महाशिवरात्रीला (Mahashivratri 2025) येथील अजमेर दर्ग्यात (Ajmer Dargah) भगवान शिवाची पूजा करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचा – 1996 ची योजना लागू करण्यास वारंवार विलंब केल्याबद्दल Supreme Court ने पंजाब सरकारला फटकारले)

गर्भगृहातील भिंतीवर भगवान शिवाची मूर्ती

विष्णु गुप्ता (Vishnu Gupta) यांनी जिल्हाधिकार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाशिवरात्र हा सण वर्षातून एकदा येतो. हा सण हिंदू मोठ्या उत्साहात साजरा करतात. भगवान शिव यांना तो समर्पित आहे आणि हिंदु धर्मात त्याचे विशेष महत्त्व आहे. अजमेर दर्गा हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करून बांधण्यात आला आहे. षडयंत्राचा एक भाग म्हणून तेथे भगवान शिवाची पूजा थांबवण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहातील भगवान शिवाची मूर्ती भिंतीवर कोरलेली आहे, जी आजही अस्तित्वात आहे. यंदा महाशिवरात्रीचा हा शुभ सण २६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी साजरा केला जाईल. हा सण भगवान शिवाला समर्पित आहे आणि हिंदु धर्मात त्याला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करावा आणि प्राचीन संकटमोचन शिव मंदिरात भगवान शिवाची पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

यासंदर्भात विष्णु गुप्ता यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. विष्णु गुप्ता यांनी म्हटले आहे की, “जिथे शिवलिंग किंवा मूर्ती आहे तिथे पूजा करण्याचा अधिकारही कायदा आपल्याला देतो. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी दर्ग्यात पूजा करण्याची परवानगी दिली पाहिजे. हा हिंदूंच्या (hindu temples) श्रद्धेचा विषय आहे.

विष्णु गुप्ता यांनी अजमेर दर्ग्यात भगवान शिव मंदिर असल्याची न्यायालयात आधीच याचिका दाखल केली आहे. हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. गुप्ता यांच्या याचिकेत वर्ष १९११ मध्ये हरविलास शारदा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख आहे. (Mahashivratri 2025)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.