Champions Trophy 2025, Ind vs Pak : विराटने सांगितली धावांचा पाठलाग करतानाची त्याची भूमिका

विराटला धावांचा पाठलाग करतानाचा बादशाह म्हटलं जातं.

63
Champions Trophy 2025, Ind vs Pak : विराटने सांगितली धावांचा पाठलाग करतानाची त्याची भूमिका
Champions Trophy 2025, Ind vs Pak : विराटने सांगितली धावांचा पाठलाग करतानाची त्याची भूमिका
  • ऋजुता लुकतुके

विराटने पुन्हा दाखवून दिलं की, तो धावांचा पाठलाग करताना बादशाह का आहे ते. यावेळी दुबईच्या रणात त्याने भारतीय संघाला अगदी अलगद सीमेपार नेलं. तो मैदानात पाय रोवून उभा राहिला. आणि १११ चेंडूंत १०० नाबाद धावा करत त्याने संघाला विजय मिळवून दिला. लक्ष्य २४१ हे अलीकडच्या मानाने सोपं होतं. पण, रोहित शर्मा (Rohit Sharma) झटपट बाद झाल्यावर भारतीय डावाला स्थैर्य हवं होतं. फलंदाजांच्या फळीचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याची गरज होती. आणि विराटने (Virat Kohli) ते काम केलं. या खेळीदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमधील १४,००० डावांचा टप्पाही त्याने पार केला. हा टप्पा सर्वात जलद पार करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा झाला आहे. (Champions Trophy 2025, Ind vs Pak)

सामन्यानंतर विराटने पाठलाग करतानाची आपली भूमिका सांगितली. ‘उपान्त्य फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा होता. आणि अशा सामन्यात शेवटपर्यंत फलंदाजी करता आली हेच मला समाधान देणारं आहे. रोहित (Rohit Sharma) लवकर बाद झाला होता. त्यामुळे खेळपट्टीकडून शिकून कामगिरी उंचावण्याची गरज होती. ते आम्ही करू शकलो, याचं समाधान आहे,’ असं विराट (Virat Kohli) म्हणाला.

(हेही वाचा – अजमेर दर्गा हे शिवमंदिर, Mahashivratri 2025 ला पूजा करण्याची परवानगी द्या; हिंदु सेनेची मागणी)

त्याला पाठलागांचा बादशाह का म्हणतात, ते त्याने पुढच्या काही ओळींमध्ये सांगितलं. ‘मधली षटकं फारशी जोखीम न पत्करता खेळून काढणं ही माझी जबाबदारी होती. या कालावधीत फिरकीपटूंचा नेटाने मुकाबला करायचा एवढंच मी ठरवलं होतं. त्यातच श्रेयसने धावांचा वेग वाढवल्यामुळे माझ्यावरील ते दडपणही गेलं. आणि मी माझ्या पद्धतीने फलंदाजी करू शकलो. मला माझा खेळ कसा आहे, याची नीट माहिती आहे. आता फक्त मैदानाबाहेरचा गलका कमी करून खेळावर लक्ष केंद्रीत करणं हेच मला करायचं आहे,’ असं विराटने (Virat Kohli) बोलून दाखवलं.

मी वास्तवात जगतो आणि संघासाठी नियमितपणे १०० टक्के देतो असंही विराटने (Virat Kohli) सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(हेही वाचा – लष्करप्रमुख जनरल Upendra Dwivedi फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना)

विराटने शुभमनचंही कौतुक केलं. ‘तेज गोलंदाज गोलंदाजी करत असताना धावा काढणं महत्त्वाचं होतं. पहिल्या पॉवरप्लेमध्ये धावा झाल्या तर फिरकीपटूंचा शांत डोक्याने सामना करता येतो. म्हणून सुरुवातीला धावा होणं गरजेचं आहे. आणि हे महत्त्वाचं काम शुभमनने केलं. शाहीनवर त्याने जो प्रतिहल्ला केला त्यामुळे पहिल्या १० षटकांत आमच्या नावावर धावा होत्या. शुबमन एकदिवसीय क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज उगीच नाही बनलेला. त्याच्यामुळे सुरुवात चांगली झाली. आणि मागाहून श्रेयस अय्यर येतो, जो करामती फटके खेळू शकतो. भारतात आणि आता भारताबाहेरही श्रेयस (Shreyas Iyer) चांगली कामगिरी करतो,’ असं विराट (Virat Kohli) दोघांविषयी बोलताना म्हणाला.

भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयानंतर उपान्त्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. तर संघाचा शेवटचा साखळी सामना खेळण्यापूर्वी भारताला ७ दिवसांची विश्रांती मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.