तेलंगणातील (Telangana Tunnel) नागरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) निर्माणाधीन बोगद्याच्या 14 किमी आतील 3 मीटर छत कोसळून 8 कर्मचारी अडकले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ (SDRF) अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बोगद्याच्या आत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. गुडघ्यापर्यंत चिखल आहे. बोगद्याच्या आत ऑक्सिजन पाठवला जात आहे. (Telangana Tunnel)
#WATCH | Nagarkurnool, Telangana | SLBC tunnel collapse: An operator of the tunnel boring machine says, “…Our mission is left for around 200 meters. Dewatering is going on. It is very difficult right now. After dewatering, we will do the cutting…” pic.twitter.com/aObCqTNTzB
— ANI (@ANI) February 23, 2025
22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. बोगद्याच्या (Telangana Tunnel) प्रवेश बिंदूपासून 14 किमी अंतरावर सुमारे 3 मीटर बोगद्याचे छप्पर कोसळले आहे. यावेळी सुमारे 60 लोक बोगद्यात काम करत होते. 52 लोक कसेबसे जीव मुठीत घेऊन बचावले, पण टनेल बोरिंग मशीन (TBM) चालवणारे 8 लोक अडकले. यामध्ये 2 अभियंते, 2 मशीन ऑपरेटर आणि चार मजुरांचा समावेश आहे. बचाव कार्य केले जात आहे. (Telangana Tunnel)
हेही वाचा-1996 ची योजना लागू करण्यास वारंवार विलंब केल्याबद्दल Supreme Court ने पंजाब सरकारला फटकारले
मात्र, बोगद्यात 11 किमी पाणी भरलं असल्याने मजूरांच्या जिवीत असण्याची शक्यता धुसर आहे. पाणी काढण्यासाठी 100 अश्वशक्तीचा पंप लावण्याचे आदेश दिले आहेत. 145 NDRF आणि 120 SDRF जवान बचावकार्यासाठी तैनात आहेत. सैन्याची एक अभियंता रेजिमेंट, सिकंदराबाद येथील पायदळ विभागाचा भाग त्याला बचावकार्यातही तैनात करण्यात आले आहे. (Telangana Tunnel)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community