-
ऋजुता लुकतुके
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव करत भारताने चॅम्पियन्स करंडकाची (Champions Trophy 2025) उपान्त्य फेरी गाठली आहे. आणि त्याचवेळी आयसीसी (ICC) स्पर्धांमधील पाकिस्तानविरुद्घचं प्रभूत्व अबाधित राखलं आहे. आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये टी-२० आणि एकदिवसीय सामने मिळून भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा १८ वा विजय होता. ही कामगिरी २२ सामन्यांमध्ये भारताने केली आहे. टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स करंडक या स्पर्धा यासाठी गृहित धरल्या आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत २००४, २००९ आणि २०१७ ची चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) स्पर्धा आणि २०२१ चा टी-२० विश्वचषक या स्पर्धांमध्ये एकेकदा भारताचा पराभव केला आहे. बाकी सर्व सामने भारताने जिंकले आहेत.
(हेही वाचा – 1996 ची योजना लागू करण्यास वारंवार विलंब केल्याबद्दल Supreme Court ने पंजाब सरकारला फटकारले)
शिवाय २०१० पासून उभय देशांमध्ये झालेल्या एकूण १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने १३ जिंकले आहेत. ४ सामन्यांत भारताचा पराभव झाल. तर एका सामन्यात निकाल लागू शकला नाही. तर चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy 2025) आता दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत आहेत. दोघांमध्ये चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy 2025) ६ सामने झाले आहेत. यातील ३ पाकने तर ३ भारताने जिंकले आहेत. २०१७ च्या चॅम्पियन्स करंडकातील अनुभव खासकरून वेदनादायी होता. या सामन्यात भारताला पाकिस्तानने (Ind vs Pak) १८० धावांनी हरवलं होतं. इतकंच नाही तर करंडकही नावावर केला होता.
रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना २४१ धावा केल्या. आणि या धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारताने ६ गडी आणि ४५ चेंडूंत हे आव्हान पार केलं. श्रेयस अय्यरचं (Shreyas Iyer) अर्धशतक तर शुभमन गिलने (Shubman Gill) ४५ धावा करून दिलेली साथ आणि विराट कोहलीचं (Virat Kohli) नाबाद शतक यांच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने स्पर्धेची उपान्त्य फेरीही गाठली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community