महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन घडवले का? साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत आहे. सरकारने दोन कोटी दिले, तर २५ लाख खंडणी म्हणून काढून घेण्याचे काम साहित्य महामंडळ करत आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय चिखलफेक झाली. त्याची जबाबदारी शरद पवार नाकारु शकत नाही. ते सुद्धा त्याला जबाबदार आहे. संमेलन अध्यक्षा तारा भवाळकर जबाबदार आहेत. तुमच्यावर (शरद पवार) चिखलफेक होते, तेव्हा आम्ही उभे राहतो ना? मग आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप होत असताना पवार साहेब गप्प कसे राहू शकतात?, असा सवाल उबाठा गटाचे (ShivSena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
(हेही वाचा – Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा सविस्तर …)
दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांनी त्याला उत्तर दिले नाही. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. परंतु ते या विषयावर गप्प आहेत. त्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवार, २४ फेब्रुवारी या दिवशी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ‘या प्रकरणात शरद पवार आपली जबाबदारी नाकारु शकत नाही. तेसुद्धा याला जबाबदार आहेत’, असे राऊत यांनी म्हटले आहे.
साहित्य मंडळाने खंडणी घेतली
संजय राऊत यांनी साहित्य महामंडळावर आरोप केले. ते म्हणाले, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन घडवले का? साहित्य महामंडळ खंडणी घेऊन संमेलन भरवत आहे. सरकारने दोन कोटी दिले तर २५ लाख खंडणी म्हणून काढून घेण्याचे काम साहित्य महामंडळ करत आहे. कार्यक्रम ठरवतात महामंडळ आणि आयोजक सतरंजी उचलण्याचे काम करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका करण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. त्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी शरद पवारांनी शिंदेंचे कौतुकही केले. त्या वेळीही संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. नंतर नरमाईची भूमिकाही घेतल्याचे महाराष्ट्राने पाहिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community