-
ऋजुता लुकतुके
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० बळी पूर्ण केले आहेत. पाकविरुद्ध भारताची सलामीची जोडी तंबूत पाठवण्यात हार्दिकची भूमिका मोलाची होती. सामन्यांत त्याने ३.८७ धावा षटकामागे देतानाच ३१ चेंडूंत २ बळी घेतले. हार्दिक शेवटच्या षटकांमध्ये घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तसंच तेज गोलंदाजी करू शकेल असा अष्टपैलू खेळाडू असल्यामुळे एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात तो भारतीय संघासाठी अत्यंत मोलाचा उपयुक्त खेळाडू आहे.
पाकिस्तानविरुद्ध हार्दिकने फटकेबाजीच्या मूडमध्ये असलेला बाबर आझम (Babar Azam) आणि जम बसलेला सौद शकील (Saud Shakeel) यांना बाद केलं. हार्दिकने भारतासाठी २१६ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ३०.७६ च्या सरासरीने २०० बळी मिळवले आहेत. २८ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताकडून यशस्वी गोलंदाजांच्या यादीत हार्दिकचा क्रमांक आता २४ वा लागतो.
(हेही वाचा – अजमेर दर्गा हे शिवमंदिर, Mahashivratri 2025 ला पूजा करण्याची परवानगी द्या; हिंदु सेनेची मागणी)
Milestone Unlocked 🔓
2⃣0⃣0⃣ international wickets and counting for Hardik Pandya 😎
Live ▶️ https://t.co/llR6bWyvZN#TeamIndia | #PAKvIND | #ChampionsTrophy | @hardikpandya7 pic.twitter.com/oxefs3BxrA
— BCCI (@BCCI) February 23, 2025
(हेही वाचा – Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा सविस्तर …)
हार्दिक भारताकडून ११ कसोटी, ९१ एकदिवसीय सामने आणि ११४ टी-२० सामने खेळला आहे. पाकिस्तान विरुद्ध डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवची (Kuldeep Yadav) गोलंदाजीही प्रभावी ठरली. आणि त्यानेही आंतरारष्ट्रीय सामन्यांमध्ये ३०० बळी पूर्ण केले आहेत. पाकिस्तानविरुद्ध त्याने ४४ धावांमध्ये ३ बळी टिपले.
एकूण १६३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कुलदीपने ही कामगिरी केली आहे. २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱा कुलदीप (Kuldeep Yadav) मागच्या ६ वर्षांत भारतासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. कुलदीपची ऑस्ट्रेलियाविरुद्धची हॅट-ट्रीक कायम लक्षात राहील अशीच होती. ३०० आंतरराष्ट्रीय बळी पूर्ण करणारा तो भारताचा पाचवा फिरकीपटू तर एकंदरीत तेरावा गोलंदाज ठरला आहे.
कसोटी – १३ सामने, ५६ बळी
एकदिवसीय – ११० सामने, १७७ बळी
टी-२० – ४० सामने, ६९ बळी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community