लाडक्या बहिणींनी (Ladki Bahin) विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले. यामुळे महायुती सरकारला दणक्यात विजय मिळवता आला. यानंतर आता राज्य सरकारने महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. होळीच्या (Holi) निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक (ration card) महिलांना साड्या दिल्या जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत. (Ladki Bahin)
हेही वाचा-Women’s Day ला पंतप्रधानांचे सोशल मिडिया खाते महिला हाताळणार; महिलांचा अनोखा सन्मान
लाडक्या बहिणींना (Ladki Bahin) साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे. लाभार्थी महिलांनी (Ladki Bahin) रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
हेही वाचा-Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस तापमानाचा यलो अलर्ट
महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी (Ladki Bahin) आनंदात आहे. परंतु साडीचा दर्जा चांगला असावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. महिलांना वेगवेगळ्या रंगाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Ladki Bahin)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community