परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी बांगलादेशला सुनावले; म्हणाले, तुम्हाला कसे संबंध हवेत…

59
परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी बांगलादेशला सुनावले; म्हणाले, तुम्हाला कसे संबंध हवेत...
परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांनी बांगलादेशला सुनावले; म्हणाले, तुम्हाला कसे संबंध हवेत...

भारतासोबत (India) नेमके कसे संबंध हवे आहेत याचा निर्णय बांगलादेशने (Bangladesh) करावा असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी केले आहे. बांगलादेशकडून वारंवार दोन्ही देशांमधील सौहार्दाच्या वातावरणाला तडे देणारे प्रकार घडल्यानंतर जयशंकर यांचे हे वक्तव्य आले आहे. बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडला आणि मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील संबंध तणावपूर्ण आहेत. तेथील हिंदूंच्या (Hindu) नरसंहारावर भारताने जोरदार आवाज उठवला आहे. त्याचवेळी बांगलादेशचे अंतरिम सरकार भारतासोबतचे संबंध बिघडवण्यात कोणतीही संधी सोडत नाही.कतेच ओमानमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहीद हुसेन (Md. Touhid Hossain) यांची भेट घेतली होती. पण बांगलादेश सुधारत नसल्यामुळे या बैठकीनंतर सुमारे आठवडाभरानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर (S. Jaishankar) यांनी बांगलादेशच्या प्रतिकूल वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला.

( हेही वाचा : सरकारला युवकांसमोर कोणाचा आदर्श ठेवायचा आहे ? Chhatrapati Sambhaji Maharaj/Bajiprabhu Deshpande

यासंदर्भात जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले की, बांगलादेशला (Bangladesh) ठरवावे लागेल की ते आपल्याशी कशा प्रकारचे संबंध ठेवू इच्छितात ? बांगलादेशासोबतचा (Bangladesh) आमचा दीर्घ आणि विशेष इतिहास 1971 चा आहे. बांगलादेश भारतासोबत चांगले संबंध हवे आहे असे म्हणू शकत नाही आणि दुसरीकडे तेथे होणाऱ्या देशांतर्गत घटनांसाठी भारताला जबाबदार धरत आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील कोणीही दररोज उभे राहून प्रत्येक गोष्टीसाठी भारताला दोष देऊ शकत नाही. याबाबतचा निर्णय बांगलादेशला घ्यायचा आहे असे सुतोवाच जयशंकर यांनी केले. द्विपक्षीय संबंधांमधील समस्यांमागे दोन पैलू आहेत. पहिला म्हणजे अल्पसंख्याकांवरील जातीय हिंसाचार. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार सुरू आहे. त्याचा परिणाम आपल्या विचारांवर नक्कीच झाला आहे. हा एक मुद्दा आहे ज्यावर आपण बोलले पाहिजे. दुसरे म्हणजे बांगलादेशचे राजकारण आहे. आता त्यांनीच ठरवावं की त्यांना आमच्याशी कसे संबंध ठेवायचे आहे ?

दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 25 फेब्रुवारीपासून गुवाहाटी येथे 45 देशांच्या राजदूतांसोबत होणाऱ्या ॲडव्हांटेज आसाम शिखर परिषदेच्या आधी सोमवारी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्ती सफारीचा आनंद घेतला. पर्यटकांची वाढती संख्या पाहून मला खूप आनंद होत असल्याचे जयशंकर (S. Jaishankar) म्हणाले. आम्ही आसामच्या फायद्यासाठी आहोत. यानंतर आम्ही गुवाहाटीला जाणार आहोत. आम्हाला आसाम आणि ईशान्येकडील राज्यांना ओळख मिळवून द्यायची असून अधिक पर्यटक आणि गुंतवणूकदार आणायचे आहेत असे जयशंकर (S. Jaishankar) यांनी सांगितले. (Bangladesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.