वाडा तालुक्यातील (Wada Taluka) वडवली गावाच्या हद्दीत असलेल्या चार प्रदूषणकारी कारखान्यांना (Wada polluting factory) बंद करण्याचे आदेश, दोन कारखान्यांना कारणे दाखवा तर एका कारखान्याचा कार्यवाही अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) काढले आहेत. (Palghar)
एम.डी. पायरोलिसेस, के.जी. एन. इंडस्ट्रियल, सन इंडस्ट्रियल व क्रेससेंट वेस्ट रिसायकलिंग या चार कारखान्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून, उर्वरित दोन कारखान्यांना कारणे दाखवा, तर एका कारखान्याचा कार्यवाही अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे लेखी पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढले आहेत.
(हेही वाचा – Marathi Sahitya Sammelan: मराठवाड्याचा ठराव साहित्य संमलेनात नाकारला; काय आहे प्रकरण?)
वडवली या ग्रामपंचायतीच्या (Vadavali Gram Panchayat) हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑईल तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या कारखान्यातून प्रदूषण होत असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. तसेच या कारखान्यातील प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नाल्यात नेहमीच टाकत असल्याने नाल्यातील मासे अनेकवेळा मृत पावले आहेत, तर दूषित पाणी जनावरे प्यायल्याने जनावरेही मृत्युमुखी पडल्याची उदाहरणे आहेत. या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे डोळेझाक करत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी एम.डी. पायरोलिसेस कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात संपूर्ण कंपनी जाळून खाक झाली. यात दोन कामगार व त्यांची दोन मुले, असे चारजण ठार झाल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. या स्फोटानंतर प्रशासन खडबडून जागे होत, चार प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश, दोन कारखान्यांना कारणे दाखवा, तर एका कारखान्याचा कार्यवाही अहवाल वरिष्ठ कार्यालयावर पाठवण्यात आला असल्याचे आदेश कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. आर. ए. रजपूत (Dr. R. A. Rajput) यांनी काढले आहेत.
(हेही वाचा – Magnus Carlsen : मॅग्नस कार्लसनने ज्या जिन्सवरून अलीकडे वाद झाला होता, तीच लिलावाला काढली)
दरम्यान, गेली दोन तीन वर्ष प्रदूषणकारी कारखान्यांमुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते अनेकदा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ग्रामस्थ तक्रारी करूनही त्याकडे डोळेझाक करीत होते. अखेर अलिकडेच झालेल्या पालकमंत्री गणेश नाईक (Guardian Minister Ganesh Naik) यांच्या जनता दरबारात प्रदूषणकारी कारखान्याची व्यथा मांडताच त्यांनी थेट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Pollution Control Board) कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community