कोळंबी (Kolambi) मासा हा एक शेलफिश आहे जो जगभरात खाल्ला जातो. त्यांचे कडक, अर्धपारदर्शक कवच तपकिरी ते राखाडी रंगाचे असते. विविधतेनुसार त्यात मऊ किंवा कठोर पोत आहे. कोळंबी मासा त्यात प्रथिने चांगली असतात, कॅलरीज कमी असतात आणि काही जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जसे की नियासिन (Niacin) आणि सेलेनियम (Selenium). कोळंबी मासा हे लक्षात घेण्यासारखे आहे की हे जगातील कोलेस्टेरॉलमध्ये (Cholesterol) सर्वात श्रीमंत पदार्थांपैकी एक आहे. आजच्या लेखात आपण घरच्या घरी झणझणीत कोळंबी भात (Homemade Seafood Meal) कसा तयार करायचा याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत. (Seafood Recipe )
हे साहित्य लागते!
अर्धा किलो कोळंबी, अर्धा किलो बासमती तांदूळ, मूठभर खडा मसाला, लिंबू, एक चमचा तिखट, छोटा चमचा हळद,चार कांदे, मूठभर आलं आणि खोबरं, एक चमचा गरम मसाला पावडर, एक टोमॅटो हे साहित्य पाककृतीसाठी आवश्यक आहे. (Seafood Recipe)
अशी आहे पाककृती ? (Traditional Recipe)
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवावा. नंतर मग कोळंबी स्वच्छ धुवून तिला लिंबू, मीठ, हळद लावून मॅरिनेट करावं. खोबरं, एक कांदा आणि खडा मसाला मंद आचेवर खमंग भाजून अगदी बारीक वाटावं. कुकरमध्ये तेल तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो व कोळंबी घालून परतावा. या कोळंबीला आता पाणी सुटेल, त्यात कोळंबी शिजवून घ्यावी, आता यात तांदूळ नथिळून घालावेत, त्यात वाटण घालून ढवळावं. बासमती तांदूळ घालून अगदी अलगद हलवावं आणि त्यात बेताचं पाणी, मीठ घालावं. तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा. आधी मीठ लावल्याने पुन्हा मीठ घालताना अंदाजाने घालावं, वरून कोथिंबीर पेरावी हवे असल्यास काजू तुकडे घालून गरमागरम सर्व्ह करावं. (Kolambi Rice ) (Seafood Recipe)
Join Our WhatsApp Community