शिवसेनेच्या नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाषण करताना शिवसेनेत दोन मर्सिडीज गाड्या दिल्या की पद मिळते, असे म्हणाल्या. त्यानंतर शिवसेना उबाठा चांगलाच आक्रमक झाला. संजय राऊत यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका केली. सुषमा अंधारे देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावर शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक बाई काय बोलली, तुम्ही तुटून पडता? आम्ही खोलात गेलो तर सगळे बाहेर येईल, असा इशारा दिला.
(हेही वाचा Women’s Day ला पंतप्रधानांचे सोशल मिडिया खाते महिला हाताळणार; महिलांचा अनोखा सन्मान)
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांना ज्यांना तिकिटे दिली, त्यांना विचारा. माझ्याविरोधात दिलेला उमेदवार पक्षाचा एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता…किती दिवसांचा आठ दिवसांचा. पक्षात येऊन आठ दिवस झालेल्या माणसाला तुम्ही तिकीट दिले होते. मग तुमचे शिवसैनिक कुठे गेले होते? जे गेले 20 ते 30 वर्षे तुमच्यासोबत काम करतात. त्यांना तिकीट का नाकारले? मराठवाड्यात यांनी अनेक ठिकाणी पैसे घेतले आणि तिकिटे वाटली आणि त्याचा परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ला ते शिवसैनिक बाजूला पडले. आता जे दलाल आहेत जे बोलतायत त्या दलालांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले. म्हणून कोणी काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय करता याचे एकदा स्पष्टीकरण द्या, असेही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले.
Join Our WhatsApp Community