किसान सन्मान निधी १२ ऐवजी १५ हजार रुपये मिळणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा 

108

CM Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत (Pradhan Mantri Kisan Samman Yojana) आता लवकरच केंद्र आणि राज्याच्या वाट्यात राज्य शासनामार्फत 3 हजारांची भर घातली जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 12 एवजी 15 हजार रुपये जमा होणार आहेत. अशी घोषणा २४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात (Nagpur) वनामती येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात केली. पंतप्रधान कृषी सन्मान निधीचा 19 वा हप्ता वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्‍थित राहून मार्गदर्शन केले. (CM Devendra Fadnavis)

किसान सन्मान निधी राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर टीका झाली, पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत हेच पैसे कामात येत आहेत. मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात (Agricultural sector) अनेक कामं केली, जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉप साठी मदत केली जाणार असे सांगतानाच चांगले काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका अशी अधिकाऱ्यांना सूचनाही त्‍यांनी केली. ॲग्रीस्टॉकमुळे (Agristack software) दलाल विरहित शेती पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सधन होत आहे. आता पर्यंत 54 टक्के शेतकरी यात सहभागी झाले. 100 टक्के शेतकरी यात आणायचे आहेत. शेतकरी उत्पादन खर्च कमी करून बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.

(हेही वाचा – Holi साजरी केलात तर हत्या करू; बरेलीत होळीसाठी कार्यक्रम ठरवणाऱ्या हिंदू तरुणांवर मुसलमानांचा हल्ला)

7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार
शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे. त्यांना आणखी मजबूत केलं जातं आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही. शिवाय कृषी सोलर पंप योजना (Agricultural Solar Pump Scheme) जेव्हा सुरू झाली तेव्हा पासून मागल्या वर्षी पर्यंत 2 लाख कनेक्शन, तर गेल्या 1 वर्षात दोन लाख कनेक्शन दिले गेलेत. त्याचा पूर्ण देखरेख इन्शुरन्स आमच्याकडे आहे. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. केंद्र आणि राज्यसरकार शेतकरी समर्पित असल्याची भावना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवली.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.