९८व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न केला होता. यावरून अनेकांनी डॉ. भवाळकर यांना प्रत्युत्तर दिले. संमेलनात राजकीय शेरेबाजी झाल्याने नाराजी व्यक्त केली गेली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी साहित्यिकांनी मर्यादा पाळाव्यात, असा सल्ला दिला.
साहित्य संमेलनातून द्वेष दिसतो आहे. संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात टीका करण्यात आली. साहित्य संमेलनाचा अशा पद्धतीने वापर केला जाणे कितपत योग्य वाटते? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (CM Devendra Fadnavis) विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा ठेवल्या पाहिजेत. अनेक साहित्यिकांना वाटते की, राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत. मग त्यांनीही पार्टी लाईनवरील कमेंट्स करणे योग्य नाही. त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) दिला.
Join Our WhatsApp Community