उत्तराखंड सरकार शालेय अभ्यासक्रमात Veer Savarkar यांच्यावरील धडा समाविष्ट करणार; शिक्षण मंत्री धनसिंग रावत यांची घोषणा

स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान बनलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांचा इतिहास शिकवण्याच्या उत्तराखंड सरकारच्या भूमिकेचे सावरकरप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

56

उत्तराखंडच्या शालेय अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar)  जीवन कार्यावर आधारित धडा समाविष्ट करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तराखंडचे शालेय शिक्षण मंत्री धनसिंग रावत यांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या शिष्टमंडळाने उत्तराखंडचे शालेय शिक्षण मंत्री धनसिंग रावत यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिले. सोमवार, २४ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह व ‘हिंदुस्थान पोस्ट’चे  संपादक स्वप्नील सावरकर यांच्या शिष्टमंडळाने मंत्री धनसिंग रावत यांची भेट घेतली.

savarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सह कार्यवाह व ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर हे उत्तराखंडचे शालेय शिक्षण मंत्री धनसिंग रावत यांना वीर सावरकर यांचा अर्धपुतळा आणि पुस्तक भेट देताना.

मुंबईप्रमाणेच उत्तराखंडातही सावरकर स्मारकासारखे कार्य व्हावे! 

महाराष्ट्राच्या मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकासारखेच कार्य उत्तराखंडमध्येही व्हावे, अशी इच्छाही रावत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सावरकर स्मारकाच्या सहकार्याने उत्तराखंडमध्ये काही प्रकल्प राबवण्याबाबतही सकारात्मकता दर्शवली आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीकारकांचे प्रेरणास्थान बनलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांचा इतिहास शिकवण्याच्या उत्तराखंड सरकारच्या भूमिकेचे सावरकरप्रेमींकडून स्वागत करण्यात येत आहे.

(हेही वाचा Malvan मध्ये राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्या धर्मांध मुसलमानांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई)

उत्तराखंड सरकारची ही भूमिका अभिनंदनीय आहे. कारण वीर सावरकर (Veer Savarkar) हे केवळ क्रांतिकारक, देशभक्त, समाजसुधारक, वक्ता किंवा लेखक नाहीत, ते राजकीय परिस्थितीचे उत्तम अभ्यासक होते. आजच्या परिस्थितीचे मुल्यमापन इतिहासाच्या दृष्टिकोनातून करून उद्या भविष्यात काय घडू शकेल याबद्दल त्यांचे अंदाज नेहमीच अचूक ठरलेले आहेत. भविष्यात काय होईल याविषयी त्यांनी अनेकदा देशाला अवगत केले होते. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्याला फाळणीसह अनेक संकटांचा सामना करावा लागला. ते परराष्ट्र धोरणाविषयी देखील तज्ज्ञ होते. दोन देशांमधील संबंध हे त्यांच्या आपापसातील हितसंबंधावरच आधारित असले पाहिजेत, ते समोरच्या देशाची राजकीय विचारधारा काय आहे, यावर असू नयेत, असे वीर सावरकर (Veer Savarkar) म्हणाले होते. त्यावरही ६५ वर्षांत लक्ष दिले गेले नाही. मात्र मागील १० वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण वीर सावरकर यांच्या विचारधारेनुसार चालत आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहत आहोत. त्यामुळे वीर सावरकर (Veer Savarkar) शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे, हे चांगलेच असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.