Shiv Sena : पुण्याचे (Pune) माजी आमदार (Former MLA) आणि कॉँग्रेस नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून मंगळवारी २५ फेब्रुवारी याबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सोबत नेण्याचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ या दिवशी धंगेकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असून कॉंग्रेस पक्ष (Congress) सोडायचा आणि शिवसेनेत प्रवेश करायचा की नाही यावर त्यांची मते जाणून घेणार असल्याचे धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे. (Shiv Sena)
आधी भेट मग ऑफर थेट
काही दिवसांपूर्वी धंगेकर यांनी शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर धंगेकर यांचे भगव्या गमछ्यातील फोटो असलेला मोबाइल स्टेटस चर्चेचा विषय ठरला आहे. पुढे शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्वतः धंगेकर यांची भेट घेऊन त्यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. कॉंग्रेसच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – UNESCO : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना UNESCO जागतिक वारसा दर्जा मिळणार!)
पुणेकरांना खात्री
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना धंगेकर यांनी शिवसेना प्रवेशाबाबतच्या बातमीचे स्पष्टीकरण केले नाही आणि सांगितले की मंगळवारी कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करू. मात्र धंगेकर शिवसेनेत प्रवेश करण्यावर ठाम आहेत, अशी खात्री पुणेकरांना वाटत असल्याचे तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community