Weather Update: राज्यात होळी आधीच जाणवू लागल्या उन्हाच्या झळा; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो? वाचा   

62

Weather Update: राज्यात होळी आधीच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दरम्यान, एप्रिल आणि मे महिना अद्यापही दूर असतानाच महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये उन्हाचा पारा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान इथं फेब्रुवारीपासूनच कमाल तापमानात (temperature) सातत्यानं वाढ होताना दिसत असून, महाराष्ट्रातून हिवाळा हद्दपार होऊन त्याची जागा केव्हाच उन्हाळ्यानं घेतली आहे. फेब्रुवारीतच तापमानाचा आकडा 38 अंशांपर्यंत पोहोचल्यामुळं यंदाचा मे महिना आणखी किती तापदायक असणार या भीतीनंच नागरिकांना धडकी भरत आहे. (Weather Update)

(हेही वाचा – Gargai Water Project च्या पर्यायी वनीकरणासाठी चंद्रपूरमधील ३८० हेक्टर जमीन)

पुणे विभागाचे IMD प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी आपल्या X माध्यमावर शेअर केलेल्या पोस्टनुसार, मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून समुद्री पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दुपारी 1 नंतर कमाल तापमानात वाढ होणार आहे.


हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यात उन्हाळा सुरु झाला असून गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरासह राज्यभर दिवसा तापमानाचा पारा प्रचंड वाढतोय. 37 अंश सेल्सियसहून अधिक तापमान वाढत आहे.  आयएमडी (Meteorology Department) ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात प्रचंड उष्णता वाढणार आहे. राज्यात पावसाची शक्यता नाही. परिणामी उर्वरित ठिकाणी कोरडे व शुष्क हवामान असेल. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना मंगळवार २५ फेब्रुवारीला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून हवामानाचे यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आले आहेत. बुधवारी उष्णतेची लाट कायम राहणार असून तापमान चढेच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

(हेही वाचा – Vehicle loan मिळवून बँकांना लावला कोट्यवधीचा चुना, ७ जणांना अटक)

पर्वतीय क्षेत्रांवर अद्यापही तापमानवाढीचा परिणाम नाही
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार उत्तराखंड आणि हिमाचल प्रांतासह अरुणाचल प्रदेश, मेघालय इथं आकाश निरभ्र असेल. जम्मू काश्मीरमध्ये पुढील 48 तासांमध्ये पावसाचा हलका शिडकावा होऊ शकतो. तर, फेब्रुवारीअखेरीस हिमाचल प्रदेशातही पावसासह हिमवृष्टीचा (snowfall) इशारा जारी करण्यात आला आहे.

हेही पाहा  – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.