Russia-Ukraine War ची आग शमणार; संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव संमत

46

युक्रेनमधील युद्ध तात्काळ थांबवण्याच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजुरी मिळाली आहे. (Russia-Ukraine War) या प्रस्तावाच्या बाजूने १५ सदस्यीय कौन्सिलमधील १० जणांनी प्रस्तावाचे समर्थन केले, तर फ्रान्ससह अन्य ५ देशांनी मतदानापासून दूर रहाण्याचा निर्णय घेतला. याआधी भारत UNGA मध्ये प्रस्तावापासून दूर राहिला, तर अमेरिकेने रशियाच्या बाजूने कौल दिला.

युनायटेड नेशनचे (United Nations) उद्दिष्टे जागतिक शांतता आणि सुरक्षा कायम ठेवणे हे आहे. जे वादाचे मुद्दे आहेत, त्यांच्यावर शांततापूर्ण तोडगे काढले जावेत. युद्ध तातडीने थांबवून शांतता जपली पाहिजे, असे या प्रस्तावात मांडण्यात आले आहे.

(हेही वाचा – Vehicle loan मिळवून बँकांना लावला कोट्यवधीचा चुना, ७ जणांना अटक)

आतापर्यंत रशिया आणि त्याचे सहकारी व्हिटोचा वापर करत होते. अमेरिकेने हा प्रस्ताव सादर केला होता ज्यावर व्हिटो अधिकार असलेले फ्रान्सशिवाय ब्रिटन, डेनमार्क, ग्रीस आणि स्लोवेनियासारख्या देशांनी मतदानात भाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने यावर कोणतीही कारवाई केलेली नव्हती. आता मात्र युक्रेन युद्ध थांबून दोन्ही देशांमध्ये शांतता स्थापित करण्यासाठी चर्चा होणार आहे.

संयुक्त राष्ट्रांचे कार्यवाहक अमेरिकन राजदूत डोरोथी शीया यांनी चर्चेत सांगितले की, या प्रस्तावामुळे आपण शांततेच्या दिशेने जाऊ शकतो. हे पहिले पाऊल असून महत्त्वाचे आहे. ज्यावर आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेत काय घडले ?

युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या तिसऱ्या वर्षी युरोपीय देशांनी युद्ध संपवण्याचे आवाहन करणारा ठराव मांडला. यामध्ये रशियावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अमेरिका (America), इस्रायल (Israel) आणि उत्तर कोरियासह (North Korea) १८ देशांनी रशियाची साथ देत युरोप आणि युक्रेनकडून सादर केलेल्या प्रस्तावाला विरोध केला. असे असले, तरी युद्ध १० राष्ट्रांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. (Russia-Ukraine War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.