PM-Kisan Samman Nidhi : देशातील ९.८ कोटी शेतकऱ्यांसाठी होळी सणापूर्वीच (Holi Festival) आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान योजनेचा १९वा हप्ता सोमवारी २४ फेब्रुवारीला थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकार मार्फत या योजनेअंतर्गत २२ हजार कोटी रुपयांचा निधीचे वाटप करण्यात आले. पीएम-किसान योजनेअंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला (farmer) दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या ३ समान हप्त्यांमध्ये ६,००० रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो. (PM-Kisan Samman Nidhi)
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा १९ वा हप्ता हस्तांतरित केल्यानंतर भागलपूर येथील मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि बिहारच्या विकासासाठी एनडीए सरकारच्या वचनबद्धतेवर भर दिला.
या वेळी त्यांनी ‘मखाना’ (फॉक्स नट) बोर्ड (Makhana Board) स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच केंद्र सरकार राज्यात चार नवीन पूल बांधण्यासाठी ११०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही संबोधित केले.
(हेही वाचा – Telangana Tunnel Collapse : बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेची शक्यता धुसर; बचावकार्यात अनेक अडथळे)
९.८ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसानचा १९ वा हप्ता ( PM Kisan 19th Installment) जारी केला असून पंतप्रधान २४ फेब्रुवारीला भागलपूरमधून पीएम-किसानचा १९ वा हप्ता जारी केला आहे. यामध्ये एकूण २२,००० कोटी रुपये थेट ९.८ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात आले आहेत.
पीएम किसानचा हप्ता कसा चेक करायचा?
जर तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे बरोबर सबमिट केली असतील. तुमचे ई-केवायसी पूर्ण असेल तर पीएम किसानचा १९वा हप्ता नक्की मिळेल. या हप्त्याची स्थिती तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.
(हेही वाचा – Telangana Tunnel Collapse : बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेची शक्यता धुसर; बचावकार्यात अनेक अडथळे)
पीएम किसान स्टेटस कसे तपासावे?
- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही तुमची स्टेटस अशा प्रकारे तपासू शकता.
- अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- आता, पेजच्या उजव्या बाजूला ‘नो युवर स्टेटस’ टॅबवर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक एंटर करा आणि कॅप्चा कोड भरा आणि ‘डेटा मिळवा’ पर्याय निवडा.
- यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर संपूर्ण स्टेटस दिसेल.
हेही पाहा –