AAP MLA Suspended : दिल्लीतील आपचे सर्व २२ आमदार निलंबित; उपराज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गदारोळ

55

दिल्ली विधानसभेत (Delhi Assembly) मंगळवार, २५ फेब्रुवारी या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. नव्हे, सभागृहाचे कामकाजच गदारोळातच सुरू झाले. उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान (Lieutenant Governor’s Address) आम आदमी पक्षाच्या आमदारांनी गदारोळ सुरू केला. त्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्षा विजेंदर गुप्ता यांनी विरोधी पक्ष नेत्या आतिशी (Atishi Marlena) यांच्यासह आपच्या सर्व २२ आमदारांना संपूर्ण दिवसासाठी निलंबित केले. (AAP MLA Suspended)

(हेही वाचा – rrb group d salary : रेल्वे भरती मंडळे म्हणजेच आरआरबी ग्रुड डी मध्ये पगार किती मिळतो? जाणून घ्या)

सभागृहाबाहेर काढण्यात आलेल्या आपच्या आमदारांची हातात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन विधानसभेबाहेर निदर्शने केली. या वेळी आतिशी म्हणाल्या, भाजपने मुख्यमंत्री कार्यालय आणि मंत्र्यांच्या कार्यालयातून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून त्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. माझा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे झाले आहेत का? याच्या विरोधातच आम आदमी पक्षाने निदर्शन केले आहे. जोवर बाबासाहेबांचा फोटो त्यांच्या जागेवर लावला जात नाही, तोवर आम्ही निदर्शने करत राहू.”

गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री यांच्या काळातील मद्य धोरणासंदर्भातील कॅगचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल मांडला. मागच्या सरकारने हा अहवाल दाबण्याचा प्रयत्न केला, अशी टीप्पणी सभापतींनी केली. (AAP MLA Suspended)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.