rrb group d salary : रेल्वे भरती मंडळे म्हणजेच आरआरबी ग्रुड डी मध्ये पगार किती मिळतो? जाणून घ्या

27
rrb group d salary : रेल्वे भरती मंडळे म्हणजेच आरआरबी ग्रुड डी मध्ये पगार किती मिळतो? जाणून घ्या

रेल्वे भरती मंडळे म्हणजेच आरआरबी हे आरआरबी ग्रुप डी चा पगार ७ व्या वेतन आयोगानुसार ठरवतात. ७ व्या वेतन आयोगानंतर आरआरबी ग्रुप डी चा पगार वर्षाला ३ ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान असतो. आरआरबी ग्रुप डी चा मूळ पगार महिन्याला ₹१८००० एवढा असतो. याव्यतिरिक्त ग्रुप डी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्तेदेखील मिळतात. आरआरबी ग्रुप डी चा पगार हा इथल्या भरती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. पगाराच्या आधारावरच बहुतेक उमेदवार भरतीसाठी अर्ज करतात. (rrb group d salary)

(हेही वाचा – top 10 motivational books : वाचा अशी १० पुस्तके जी बदलू शकतात तुमचं आयुष्य!)

आरआरबी ग्रुप डी चा पगार किती आहे?

भारतीय रेल्वेमध्ये लेव्हल १ च्या पदांसाठी कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी आरआरबी ग्रुप डी ची परीक्षा घेतली जाते. सर्व पदांसाठी आरआरबी ग्रुप डी चा पगार हा त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणानुसार ₹२२,५०० ते ₹२५,३८० च्या दरम्यान असतो. आरआरबी ग्रुप डी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा सातव्या वेतन आयोगानुसार महिन्याला ₹१८,००० एवढा असतो.

आरआरबी ग्रुप डी चा पगार हा रेल्वे महामंडळात काम करणाऱ्या लाखो इच्छुकांसाठी प्रेरणा म्हणून काम करतो. आरआरबी ग्रुप डी च्या पगाराची सारणी ही सातव्या वेतन आयोगानुसार केलेली आहे. या रचनेमुळे कर्मचाऱ्यांना त्यांची भरपाई कशाप्रकारे मोजली जाते हे समजायला मदत मिळते. वेगवेगळ्या शहरांनुसार आरआरबी ग्रुप डी चा पगार वेगवेगळा असू शकतो. (rrb group d salary)

(हेही वाचा – gudi padwa wishes in marathi : गुढी पाडव्याला करा आपल्या आवडत्या व्यक्तीवर शुभेच्छांचा वर्षाव)

  • आरआरबी गट डी चा पगार साधारणपणे ₹५,२०० ते ₹२०,२०० च्या दरम्यान असतो.
  • याव्यतिरिक्त त्यांना ग्रेड पे ₹१८०० दिले जातात.
  • आरआरबी ग्रुप डी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत वेतन ₹१८,००० एवढं दिलं जातं.
  • तसंच त्यांना ₹३,०६० एवढा डीए म्हणजेच डेली अलाऊन्स दिला जातो.
  • तर एचआरए हा वेगवेगळ्या शहारानुसार २४%, १६% आणि ८% असू शकतो.
  • आरआरबी च्या कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता हा त्यांच्या काम करण्याच्या वेगवेगळ्या ठिकानांनुसार ₹२७,९२०, ₹२७,००० आणि ₹२५,५६० एवढा असतो. (rrb group d salary)

(हेही वाचा – रक्ताच्या नात्यातील व्यक्तींची जात वेगवेगळी कशी ?; Mumbai High Court म्हणाले…)

१० वर्षं काम केल्यानंतर आरआरबी ग्रुप डी च्या कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल?

१० वर्षं आरआरबी ग्रुप डी मध्ये काम केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार हा विविध घटकांवर अवलंबून ₹२५,००० रुपयांपर्यंत वाढतो. तसंच कर्मचाऱ्यांचा पगार हा ३९% महागाई भत्त्यांच्या आधारावर सुधारित केला जातो. तर पाच वर्षांनंतरचा पगार हा त्यांच्या पगाराच्या बँडवर आणि ते ज्या शहरात नियुक्त आहेत त्या शहरानुसार कमीतकमी १५,००० रुपयांपर्यंत वाढतो.

सुरुवातीला आरआरबी ग्रुप डी च्या पगाराचं पॅकेज वर्षाला ३ ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान असतं. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना आरआरबी ग्रुप डी च्या पगाराचा भाग म्हणून वेगवेगळे भत्ते देखील मिळतात. (rrb group d salary)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.