Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय; तर महाराष्ट्र राज्य आधारसामग्री धोरणास मान्यता, वाचा सविस्तर

151

Maharashtra Cabinet Meeting : बारामती आणि परळी वासियांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत दिलासादायक निर्णय घेण्यात आले. पशुवैद्यक विषयात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन (New Veterinary Degree College established) करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Maharashtra Cabinet Meeting)

राज्यमंत्री मंडळातले सात निर्णय कोणते ?

१) पौड, ता. मुळशी, जिल्हा पुणे येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.
(विधी व न्याय विभाग)

२) ठाणे जनता सहकारी बँकेत (Thane Janata Cooperative Bank) सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली.
(वित्त विभाग)

३) १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय; अशा ३३२ गावठाणासाठी ५९९.७५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी दिली.
(मदत व पुनर्वसन विभाग)

(हेही वाचा – AAP MLA Suspended : दिल्लीतील आपचे सर्व २२ आमदार निलंबित; उपराज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी गदारोळ)

४) महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता; राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती.
(नियोजन विभाग)

५) बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी दिली.
(कृषि व पदुम विभाग)

६) परळी, जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी दिली.
(कृषि व पदुम विभाग)

७) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८(३) १९५५ मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला मान्यता देण्यात आली आहे.

(हेही वाचा – bjp membership card : भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे म्हणजेच bjp चे सदस्य व्हायचंय? मग असे करा online apply!)

दुसरीकडे, पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘MIDC’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन जलजीवन मिशनअंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी मंगळवारी  संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, स्वच्छ भारत मिशनमधून (Swachh Bharat Mission) निधी देण्यात येईल, त्यासोबत ग्रामपंचायतीच्या वाट्यासह ‘सीएसआर’ निधी उभारण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.