
-
प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रयत्नांमुळे राज्य मंत्रिमंडळाने बारामती (पुणे) आणि परळी (बीड) येथे दोन नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. जानेवारी २०२५ मध्ये बारामती येथे झालेल्या ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शनात अजित पवार यांनी या महाविद्यालयांची घोषणा केली होती. अवघ्या महिनाभरात या घोषणेवर अंमलबजावणी करत त्यांनी मंजुरी मिळवली. या तातडीच्या निर्णयामुळे अजित पवार यांच्या प्रशासन कौशल्याचे पुन्हा एकदा प्रदर्शन घडले आहे.
पशुपालन क्षेत्राला नवी चालना मिळणार
महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून, पशुधन आणि दुग्ध व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु अद्ययावत पशुवैद्यकीय सेवा आणि प्रशिक्षित पशुवैद्यकांची राज्यात मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. या नव्या महाविद्यालयांमुळे प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढेल आणि राज्यभर दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.
बारामती आणि परळी येथे महाविद्यालयांसाठी जागा निश्चित
बारामतीतील कऱ्हावागज येथे ८२ एकर, तर परळी (लोणी) येथे ७५ एकर जागेवर ही शासकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून प्रत्येकी ५६४.५८ कोटी रुपये अशा एकूण ११२९.१६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Thane महापालिकेची अनधिकृत शाळांविरोधात कडक कारवाई; पोलिसांत तक्रार, एफआयआर दाखल)
प्रत्येकी २३४ नियमित आणि ४२ मानधनावरील पदांना मान्यता
- शिक्षक संवर्गासाठी – ९६ नियमित पदे
- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी – १३८ नियमित पदे
- बाह्यस्त्रोतांद्वारे ४२ पदे मानधन तत्त्वावर भरण्यास मान्यता
पशुपालकांच्या मागणीला तातडीने प्रतिसाद
बारामती येथे जानेवारी २०२५ मध्ये आयोजित ‘कृषिक-२०२५’ प्रदर्शनात शेतकरी आणि पशुपालकांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी केली होती. अजित पवार (Ajit Pawar) यांनी तात्काळ या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महिनाभरातच मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवली.
राज्यभरातून सरकारच्या निर्णयाचे स्वागत
या निर्णयामुळे पुणे आणि बीड जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा अधिक सुलभ होणार असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी संशोधन आणि नवे तंत्रज्ञान उपलब्ध होईल. कृषीपूरक व्यवसायांना चालना मिळणार असल्याने हा निर्णय राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. (Ajit Pawar)
अजित पवार यांच्या वेगवान निर्णयक्षमतेचे पुन्हा एकदा उदाहरण
राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिन्याभराच्या अल्प कालावधीत हा महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करून घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या कृषी व पशुपालन क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community