BMC Election : आता ऑक्टोबर, नोव्हेंबर शिवाय महापालिका निवडणुकीला नाही मुहूर्त

2001
BMC Election : आता ऑक्टोबर, नोव्हेंबर शिवाय महापालिका निवडणुकीला नाही मुहूर्त
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा तारीख पडली आहे. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी ४ मार्चपर्यंतची तारीख मागून घेतल्याने न्यायालयाने याला अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यांत होण्याची शक्यता मावळली असून आता ही निवडणूक ऑक्टोबर तथा नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यताच निर्माण झाली आहे. (BMC Election)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयात कोणतेही निर्देश दिलेले नाही. आता या प्रकरणावर येत्या ४ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख सुचवली होती. त्यावर न्यायालयाने अनुकूलता दर्शवली आहे. (BMC Election)

(हेही वाचा – नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या Shivsena ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा ‘मातोश्री’त अपमान?)

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम निर्देश प्राप्त होणे अपेक्षित होते आणि जर ते प्राप्त झाले असते तर निवडणूक विभागाला पुढील दिशा प्राप्त झाली असती. परंतु ही याचिकाच सुनावणीला न येता ४ तारीख मागून घेण्यात आल्याने आता एप्रिल किंवा मे महिन्यात होणे शक्यच नसल्याचे स्पष्ट होत आहे. (BMC Election)

निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुबईतील २२७ प्रभागाबाबत जरी निर्णय दिला तरी प्रभाग सिमा रेषांबाबतची प्रक्रिया राबवून राजकीय पक्षांकडून हरकती व सूचना मागवाव्या लागतील. त्याबरोबरच लोकसंख्या आणि मतदार यादी यांची सांगड घालून प्रभाग निहाय याद्या तयार करून यावरही हरकती व सूचना मागवून घ्याव्या लागतील. याला कमीत कमी ४५ ते जास्तीत जास्त ६० दिवसांचा अवधी लागेल. आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करून त्यासाठी ४५ दिवसांचा अवधी लागणार असल्याने कमीत कमी यासर्व प्रक्रियांसाठी ९० दिवस आणि जास्तीत जास्त १२० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लक्षात घेता ही निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होणे शक्य नाही. (BMC Election)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला पुरस्कार)

तसेच मे महिन्यांत किंवा पावसाळ्यात निवडणूक घेतल्या जात नाहीत. मागील लोकसभा निवडणूक २० मे रोजी घेण्यात आली होती, त्याचा फटका भाजपा शिवसेना युतीला बसला होता. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत मे महिन्यात घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जर न्यायालयाने मार्च मध्ये होणाऱ्या तथा त्यानंतर होणाऱ्या दिवसांमध्ये निर्णय दिल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबर निवडणुका घेणे शक्य होईल. पण शेवटी न्यायालय या प्रकरणामध्ये कशाप्रकारे आणि कधी निर्णय देते यावरच महानगर पालिका आणि पालिकांच्या निवडणुकीचे भविष्य अवलंबून आहे. (BMC Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.