अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला (Iran) कमकुवत करण्यासाठी त्यांच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उद्योगांशी संबंधित कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.यामध्ये चार भारतीय कंपन्यांचा देखील समावेश आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे नेटवर्क कोट्यवधी डॉलर्सच्या कच्च्या तेलाची विक्री बेकायदेशीर मार्गाने करण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे हे निर्बंध लादण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ट्रम्प यांचा हा निर्णय इराणच्या (Iran) कठोर धोरणांविरुद्ध आहे. इराणकडून बेकायदेशीरपणे होणारी कच्च्या तेलाची विक्रीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये ऑस्टिन शिप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, बीएसएम मरीन एलएलपी (BSM Marine LLP), कॉसमॉस लाइन्स इंक आणि फ्लक्स मेरीटाईम एलएलपी या भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. मात्र, आतापर्यंत भारताकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
( हेही वाचा : Mantralaya च्या सुरक्षा जाळीवर उडी घेत तरुणाचं आंदोलन)
ट्रम्प (Donald Trump) यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारताचे इराण आणि अमेरिका दोन्ही देशांसोबत संबंध चागंले आहेत. भारत- अमेरिका संबंध (India-US relations) चांगले असले तरी गेल्या काही काळापासून USAID निधीमुळे तणावाचे वातावरण आहे. ट्रम्प (Donald Trump) यांच्या या निर्णयामुळे भारताच्या तेल उद्योगावर आयातींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.अमेरिकेचा वाढता दबाव दोन्ही देशांतील संबंध बिघडवू शकतो असे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतीय व्यापार क्षेत्रात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे भारताला दोन्ही देशांसोबत संतुलन राखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. (Donald Trump)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community