महाराष्ट्रातही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Workers) आनंदाची बातमी आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने ३ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने २५ फेब्रुवारी २०२५ ला शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना (Workers) अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०२४ पासून सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा वाढीव महागाई भत्ता १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार हा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाणार आहे. अर्थात १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या सात महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२५ च्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाणार आहे.
(हेही वाचा नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या Shivsena ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा ‘मातोश्री’त अपमान?)
सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Workers) या मागणीला अखेर यश आले असल्याचे दिसत आहे. शासनाच्या या निर्णयावर सरकारी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा १७ लाख शासकीय कर्मचाऱ्यांना (Workers) फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आली असून फेब्रुवारीच्या वेतनात कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community