-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५) जाहीर करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध आहे.
(हेही वाचा – BMC : चुनाभट्टी, कुर्ला येथील रेल्वे मार्गावर पाणी साचणार नाही याबाबत महापालिका प्रशासन साशंकच)
मागील २ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ आणि ११ डिसेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ या कालावधीदरम्यान ‘कार्यकारी सहायक’ या पदासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडली. या १ हजार ८४६ पदांसाठी एकूण १ लाख ११ हजार ६३७ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यापैकी ९१ हजार २५२ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. या, परीक्षेचा निकाल मंगळवारी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
(हेही वाचा – प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अव्वल; कृषिमंत्री Manikrao Kokate यांची माहिती)
एकूण १७३४ पानांचा हा निकाल असून यामध्ये सर्व ९१ हजार २५२ उमेदवारांचा निकाल (गुण) समाविष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर ‘उज्ज्वल संधीकरिता तथा सर्व नोकरीच्या संधी तथा प्रमुख कर्मचारी अधिकारी’ या सदरामध्ये हा निकाल उपलब्ध आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community