kalamb beach : सर्वांगसुंदर अशा कळंब बीच जवळ कोणतं रेल्वे स्थानक आहे?

39
kalamb beach : सर्वांगसुंदर अशा कळंब बीच जवळ कोणतं रेल्वे स्थानक आहे?

मुंबई हे असंख्य लोकांचं स्वप्नांचं शहर आहे. त्याला कारणही तसंच आहे. मुंबई शहरात कित्येक पर्यटन स्थळं आहेत. त्यांत या शहरातले आणि शहराच्या आसपासचे समुद्रकिनारे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. जोडीदारासोबत चमकणार्‍या सोनेरी वाळूवर फिरायचं असो किंवा कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर मजा करायची असो त्यासाठी हे समुद्रकिनारे अतिशय अनुकूल आहेत. (kalamb beach)

मुंबईजवळ असलेले समुद्रकिनारे म्हणजे अलिबाग बीच, रत्नागिरी बीच, गणपतीपुळे बीच, तारकर्ली बीच, दमण बीच, मुरुड-जंजिरा बीच, हर्णे बीच आणि इतर असंख्य समुद्रकिनारे आहेत जे फक्त निसर्ग सौंदर्यच वाढवत नाहीत तर, इथे येणार्‍या प्रत्येकाला मनःशांतीही देतात. समुद्राचं खरं सौंदर्य पाहण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्त हे सर्वोत्तम असते. कारण यावेळी आकाशाची आभा बदलते, ती अतिशय मोहक दिसते. (kalamb beach)

(हेही वाचा – 5 star hotels in goa : गोव्यामध्ये गेलात तर ‘ह्या’ 5 star हॉटेलमध्ये रहा आणि पिकनिकचा आनंद घ्या)

जुहू बीच, गिरगाव चौपाटी, अक्सा बीच, वर्सोवा बीच, मढ आयलंड, गोराई बीच, मार्वे बीच, मनोरी बीच, उरण बीच, कळंब बीच, राजोडी बीच, अलिबाग बीच, मुरुड बीच, श्रीवर्धन बीच, गणपतीपुळे बीच, मांडवा बीच, किहिम बीच, रत्नागिरी बीच, तारकर्ली बीच आणि इतर अनेक अद्भुत समुद्रकिनारे मुंबईत आणि आसपासच्या परिसरात आहेत. त्यांपैकी आम्ही तुम्हाला कळंब बीचबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात.. (kalamb beach)

महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यात असलेल्या नालासोपारा शहरात असलेला कळंब बीच हा खरोखरच मोठा आणि एकांत समुद्रकिनारा आहे. शहराच्या कोलाहलापासून दूर असलेला हा समुद्रकिनारा शांतता आणि पूर्णपणे मंत्रमुग्ध करणार्‍या वातावरणामुळे खूप सुंदर भासतो. कमी वस्ती आणि काही निवडक भोजनालये असलेला, कळंब बीच हा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी खूप मोहक दिसतो. या समुद्रकिनार्‍यावर पाम वृक्षांची गर्दी आणि काळी वाळू आहे. याव्यतिरिक्त इथे अनेक रिसॉर्ट्सही आहेत. हा समुद्रकिनारा म्हणजे फक्त झुला झुलण्यासाठी आणि मोकळ्या आकाशाखाली सनबाथ घेण्याण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. (kalamb beach)

(हेही वाचा – Tamil Nadu मध्ये पुन्हा हिंदीद्वेष; मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा हिंदीला विरोध; केंद्र सरकारच्या विरोधात भाषिक युद्धाचा इशारा)

अर्नाळा बीच, नवापुरा बीच आणि राजोडी बीच नंतर चौथ्या क्रमांकावर असलेला कळंब बीच हा इतर बीचेसच्या तुलनेने कमी गर्दीचा आहे. एवढंच नाही तर कळंब बीच हा संपूर्ण मुंबईतल्या प्रदूषणमुक्त समुद्रकिनार्‍यांपैकी एक मानला जातो. इथला पाण्याचा प्रवाह दिवसा डुबकी मारण्यासाठी अनुकूल आहे. सूर्यास्त हे या समुद्रकिनार्‍यावरच मुख्य आकर्षण आहे. इथला मंत्रमुग्ध करणारा सूर्यास्त आणि सुंदर आभा असलेलं वातावरण चित्रकारांना आणि फोटोग्राफर्सना आकर्षित करतं. जर तुम्हाला एकांतात काही वेळ घालवायचा असेल तर हा समुद्रकिनारा हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. या समुद्रकिनार्‍यावर जलक्रीडा, पॅराग्लायडिंग, उंटांची सवारी, घोडेस्वारी इत्यादींचा आनंदही तुम्ही घेऊ शकता. (kalamb beach)

कळंब समुद्रकिनार्‍याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

सप्टेंबर ते मार्च हा काळ कळंब समुद्रकिनार्‍याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता आणि आर्द्रतेमुळे इतर महिन्यांमध्ये इथे वेळ घालवणं असह्य होऊ शकतं.

कळंब समुद्रकिनार्‍याला भेट देण्यासाठी काही टिप्स
  • पिण्याचे पाणी कायम सोबत बाळगा. कारण या समुद्रकिनाऱ्यावर खूप कमी प्रमाणात भोजनालये आहेत. तसंच त्यांपैकी काहींच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवता येतो.
  • समुद्रकिनाऱ्यावर रस्त्यावरचे दिवे नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना नाहीत. म्हणून शक्यतो दिवसा इथे भेट द्या. सूर्यास्तानंतर जास्त काळ इथे न थांबलेलंच बरं. (kalamb beach)

(हेही वाचा – “कोणतीही आई स्वतःच्या मुलाला मारहाण करणार नाही” ; Bombay High Court चे निरीक्षण)

कळंब समुद्रकिनार्‍यावर कसं पोहोचायचं?

कळंब समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे पश्चिम रेल्वेलाईनवरचं नालासोपारा हे स्टेशन आहे. कळंब बीचवर पोहोचण्यासाठी नालासोपारा या स्टेशनवर उतरून भाड्याने ऑटो-रिक्षा घेऊन जाऊ शकता. याव्यतिरिक्त इथल्या नगरपालिकांच्या बसनेही तुम्ही प्रवास करू शकता. पण जर तुम्हाला जास्त आरामदायी प्रवास करायचा असेल तर, तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने किंवा टॅक्सी-कॅब बुक करून जाऊ शकता. (kalamb beach)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.